शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (08:54 IST)

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे धोकादायक ठरु शकतं.... कारणे जाणून घ्या

हिवाळ्याचा हंगाम आल्यावर सर्वांचा जीवनशैलीत जणू वेगळेच बदल होतात. स्वतःला थंडीपासून वाचविण्यासाठी उबदार कपडे घालतो आणि गरम जेवणाचा आस्वाद घेतो. तसेच गरम पाण्याने अंघोळ करतो. हिवाळ्यात क्वचितच असे घर असणार जिथे अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर केला जात नसेल. पण आपल्याला हे माहीत आहे का की अंघोळीसाठी अधिक गरम पाणी घेतल्यानं किंवा जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्यानं आपल्या त्वचे आणि आरोग्य दोन्हीवर विपरीत परिणाम होतो. चला तर मग गरम पाण्याने अंघोळ केल्याचे दुष्परिणाम जाणून घेऊ या.  
 
1 प्रजनन क्षमतेवर प्रभाव होतो - 
तज्ज्ञाच्या मतानुसार, 30 मिनिटापेक्षा जास्त काळ गरम पाण्याने अंघोळ केल्यानं मानवाच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून ज्या लोकांना आधीच प्रजननाशी निगडित समस्या आहेत, त्यांनी कोमट पाण्याने अंघोळ करावी. अशा लोकांनी बाथटब मध्ये बऱ्याच काळ गरम पाणी घालून झोपणे किंवा अंघोळ करण्याचा सल्ला दिला जात नाही.
 
2 त्वचेचे संसर्ग आणि ऍलर्जीचा धोका होऊ शकतो -
सतत गरम पाण्याने अंघोळ केल्यानं त्वचेचे संसर्ग आणि ऍलर्जी होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की जेव्हा आपण सतत गरम पाण्याचा वापर अंघोळ करण्यासाठी करता तर या मुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा गमावता, ज्यामुळे आपल्याला वारंवार खाज येते. ज्या मुळे आपल्याला त्वचेचे संसर्ग आणि ऍलर्जी होण्याची शक्यता देखील वाढते.
 
3 आळशीपणा वाढतो - 
डॉक्टरांच्या मते, गरमपणी आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी कमी करतं. वास्तविक जेव्हा आपण सकाळी गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा आपण इतका आराम अनुभवता की आपल्याला एक छोटीशी डुलकी घ्यावीशी वाटते. हे आपल्या शरीरास ताजेतवाने करून त्याला ऊर्जा देण्याऐवजी आळशी बनवतं.
 
4 त्वचेची समस्या -
गरम पाण्याने अंघोळ केल्यावर आपल्याला त्वचेचे आणि आरोग्याचे नुकसान होते. जेव्हा आपण सतत गरम पाण्याने आंघोळ करतात या मुळे त्वचा कोरडी पडायला लागते, ज्यामुळे तीव्र खाज येण्याची समस्या उद्भवते. या शिवाय गरम पाणी आपल्या चेहऱ्या आणि त्वचेची चमक कमी करत. जे लोक गरम पाण्याने अंघोळ करतात, त्यांचा त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात आणि ते वृद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागतात. तसेच, गरम पाणी डोक्यावर पडल्याने केसांचे मूळ कमकुवत होतात. ज्यामुळे केस गळती होऊ लागते आणि आपल्याला कोंड्याच्या समस्येला देखील सामोरी जावं लागतं.