रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (00:08 IST)

सावधान! अपुर्‍या झोपेुळे गंभीर आजार

झोप पूर्ण न झाल्यामुळे फक्त दुसर्‍या दिवशी आळस व थकलेचेच वाटत नाही तर एका व्यापक दृष्टीने ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीही कारणीभूत ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. सायन्स डव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार झोप पूर्ण न झाल्याने डीएनएच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा होऊ लागते. एका रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर स्नायू छोटे होऊ लागतात आणि चरबी वेगाने जमा होऊ लागते. दुसरीकडे अनेकजण रात्री उशिरा जेवण करणे सकाळी थकव्यामुळे व्यायाम न करणे यास लठ्ठपणाचे कारण समजतात. शास्त्रज्ञांनी या आधीही अपुर्‍या झोपेचा वजनवाढीसोबत संबंध जोडला होता. मात्र त्यामागील मूळ कारण ते स्पष्ट करू शकले नव्हते. आता त्यास शरीराच्या जैविक घड्याळासोबत जोडून सहजपणे समजले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्यावेळी शरीर थकलेले असते, तेव्हा ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही. अशा स्थितीत टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनामुळे भविष्यात गंभीर आजारांपासून सुटका करण्याचा रस्ता खुला होईल. लठ्ठपणामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. यामुळे कर्करोग व पक्षघाताचीही शक्यता वाढते. शरीरात वाढलेली चरबी जगभरात मृत्यूचे कारण ठरत आहे व अपुरी झोप चरबीस आमंत्रण देते.