मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

आपण डाउनलोड तर नाही केले हे अॅप

अनेकदा आम्ही प्ले स्टोअरवर जाऊन अॅप डाउनलोड करतो आणि वापरणे सुरूही करतो परंतू यामुळे उद्भवणारा त्रास नंतर जाणवतो.
 
अनेकदा बोगस अॅप डाउनलोड होतात आणि हे अॅप आमची खाजगी माहिती चोरतात किंवा हॅक देखील करू शकतात. म्हणून बोगस आणि रिअल अॅपमध्ये अंतर जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणून बघा की अॅप डाउनलोड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे: 
 
- अॅप डाउनलोड करण्यापूर्वी पब्लिशर कोण आहे जाणून घ्यावे अर्थात अॅप कोणत्या कंपनीने पब्लिश केले आहे. अनेकदा हॅकर्स जरा ट्विस्ट करून अॅप्समध्ये बदल करतात ज्यामुळे यूजर्स बोगस अॅप ओळखू पावत नाही. म्हणून अॅप डाउनलोड करण्यापूर्वी पब्लिशरचे नाव माहीत करून घ्या.
 
- अॅप डाउनलोड करताना त्याची लास्ट अपडेट आणि प्ले स्टोअरवर अपलोड होण्याची तारीख तपासा. यात समस्या येत असल्यास त्याहून जुळलेली माहिती वाचावी. आपल्या बोगस असल्याची शंका असल्यास अॅप डाउनलोड करू नका.
 
- प्ले स्टोअरवर एक सारख्या नावाचे अनेक अॅप्स दिसतात. केवळ त्यांच्या नावाच्या स्पेलिंग्समध्ये एखादा अक्षराचं बदल असतं. म्हणून स्पेलिंग वाचून, लोगो प्रामाणिक आहे की नाही हे बघून मगच अॅप डाउनलोड करा.
 
- अॅपचे कस्टमर रिव्यू वाचा. याने आपल्याला त्या अॅपबद्दल लोकांची प्रतिक्रिया कळून येईल. रिव्यू वाचून आपण सतर्क होऊ शकता.