suvichar

Pudina Benefits गुणकारी पुदीना, आरोग्यासाठी 10 फायदे

Updated: शुक्रवार, 7 मे 2021 (11:23 IST)
 
सर्दी, पडसे, खोकला आणि तापात आराम मिळावा यासाठी पुदीन्याचा रस, मिरपूड आणि काळे मीठ मिसळून ते उकळून चहा सारखे प्यावे.
 
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी पुदीना पाने वाळवून पावडर तयार करावी. ही पावडर वापरल्याने समस्या सुटेल.
 
पोटाची उष्णता कमी करण्यासाठी पुदीना वापरणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होण्यासही फायदा होतो. त्याचे कोणतेही 
 
दुष्परिणामही नाहीत.
 
जे लोक दिवसभर बाहेर असतात त्यांना पायातील तलवे जळजळ करु लागतात. अशा परिस्थितीत त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेली पुदीन्यांची पाने वाटून पायाच्या तळावर लावावी. 
 
पायांची उष्णता देखील कमी होईल.
 
पुदीना ताक, दही, कच्च्या आंब्याचा रसात मिसळून प्यायल्यास पोटातील जळजळीवर आराम होईल आणि गरम वारा आणि उष्माघातापासून संरक्षण मिळेल.
 
पुदीन्याच्या पानांनी त्वचेचे अनेक प्रकारचे रोग दूर करता येतात. जखमेच्या उपचारांसाठी देखील ते चांगले आहे.
 
जर तुम्हाला सतत हिचकीचा त्रास होत असेल तर पुदीनामध्ये साखर घाला आणि हळू हळू चावत राहा. काही वेळेत हचकीपासून मुक्त व्हाल.
 
याशिवाय उन्हाळ्यात पुदीनाची पेस्ट चेहर्‍यावर लावल्यास त्वचेची उष्णता संपेल आणि ताजेपणा जाणवेल.
 
पुदीन्याच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

गणेशोत्सवासाठी खास नैवेद्य: जिभेवर विरघळणारा केळी बेसन हलवा; Banana Besan Halwa

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

चिया बिया या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात, कोणी खाऊ नये

मोबाईल अॅप डेव्हलपर कसे व्हावे? आवश्यक कौशल्ये, शिक्षण आणि करिअरच्या संधी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments