Festival Posters

शिंकताना किंवा खोकताना लघवी होत असेल तर असू शकतो हा आजार...

Updated: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (15:27 IST)
 
मूत्रमार्गाचे अनियंत्रण म्हणजे माणसाची इच्छा नसूनही शरीरातून लघवी स्वतःच बाहेर पडणे. आपले मूत्र मूत्राशयात साठवले जातात. ज्यावेळी मूत्राशय भरायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला लघवी येते. काही जण लघवी आल्यावरही जात नाही आणि लघवी थांबवतात. अशात स्नायू कमकुवत झाल्यास अनियंत्रणाचा त्रास उद्भवतो. अश्या 
 
परिस्थितीत शिंक किंवा खोकला आल्यावर लघवी होऊन जाते. 
 
कारणे- 
स्नायूंचा कमकुवतपणा 
महिलांमध्ये सरत्या वयानुसार हा आजार होऊ शकतो. साधारणपणे वयाच्या 30 ते 35 वर्षानंतर हा त्रास उद्भवतो. 
काही महिलांमध्ये वृद्धत्वानुसार हा आजार संभवतो. 
बाळास जन्म दिल्यावर अनेक स्त्रियांच्या खालील शरीराच्या स्नायू कमकुवत होतात. कारण बाळाच्या जन्माच्या वेळीस हे स्नायू जास्त ताणले जातात. जेव्हा आई कमजोर आणि मूळ सशक्त असल्यास असे होणे अधिक संभवते.
या शिवाय स्थूलपणा, मधुमेह असल्यास हा त्रास संभवतो.  
अत्यधिक कॉफीचे सेवन केल्यास.
धूम्रपानाची सवय असल्यास.
 
उपचार-
हा आजार दीर्घकाळापासून असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे नितांत आवश्यक आहे. मूत्राशयाच्या व्यायामांपासून ते ऑपरेशनपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहे.
डॉक्टर रुग्णाला जीवनशैलीत सुधारण्याचा सल्ला देतात. धूम्रपान न करणे आणि जास्त कॉफी न पिण्याचा सल्ला दिला जातो. 
स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम शिकवले जातात. यांना पेल्विक फ्लोर स्नायूंचे प्रशिक्षण व्यायाम असे म्हणतात.
मूत्राशयाचे प्रशिक्षण दिले जाते. ह्यात जास्त जोरात लघवी आल्यास काय करणे. तसेच प्रशिक्षण देऊन लघवी कशी थांबवून ठेवू शकतो शिकवणी दिली जाते.
या सर्व उपचारामुळे हा त्रास दूर केला जातो. नाहीतर औषधे देण्यात येतात. तरी परिणाम हाती येत नसल्यास शल्यचिकित्सा केली जाते.
 
तरी या आजाराबद्दल महिला जागरूक नाहीत. बऱ्याच स्त्रिया हे सामान्य लक्षण असल्याचा विचार करून डॉक्टरांकडे जात नाही. पण वेळीच ह्याचे निदान न केल्यास हा आजार गंभीर होऊ शकतो. यासाठी गरज आहे की स्त्रियांनी लाज न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावर उचित औषधोपचार करावं. हा एक सामान्य आजार असून उपचार करणे देखील सोपे आहे. परंतू दुर्लक्ष केल्याने समस्या मोठं रूप धारण करू शकते.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

Modak Variety गणेशोत्सव विशेष गणपती बाप्पासाठी खास ट्रेंडिंग मोदकाचे प्रकार

ब्लॅक कॉफीचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे; किती प्रमाणात प्यावी जाणून घ्या

Financial Sector मध्ये करिअरच्या उत्तम संधी; पात्रता, व्याप्ती आणि पगाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

लघु कथा : कोल्हा आणि सशाची मेजवानी

पुढील लेख
Show comments