रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:33 IST)

Eat a Banana Daily रोज एक केळ खाल्ल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे दिसून येतील

Banana
तुम्ही अनेकदा डॉक्टरांच्या आणि तुमच्या वडिलधार्‍यांच्या तोंडूनही ऐकले असेल की रोज एक सफरचंद खावे कारण ते शरीराला अनेक फायदे देते. 

सफरचंद खाणे आरोग्यासाठी चांगले असते, त्याचप्रमाणे रोज एक केळी खाण्याचे देखील आश्चर्यकारक फायदे आहेत. साधारणपणे लोक जास्त भूक लागल्यावर, उपवासात किंवा नाश्ता करताना केळी खातात. पण केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही ते रोज खाण्यास सुरुवात कराल. योग्य वेळी आणि आवश्यक प्रमाणात केळी खाल्ले तर ते तुमच्या शरीराला अनेक फायदे देऊ शकते.
 
पोषक तत्वांनी युक्त केळी- केळी हे अतिशय आरोग्यदायी आणि चवदार फळ मानले जाते. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे पचन, हृदयाचे आरोग्य आणि वजन नियंत्रणात मदत करतात. केळीत थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि फॉलिक अॅसिड सारखे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय केळीमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते
 
हे पोट निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. चला जाणून घेऊया याचे इतर फायदे...

मधुमेहींसाठी- मधुमेहींसाठी कोणती फळे खावीत ही मोठी समस्या आहे. केळी चवीला गोड असल्याने बहुतेक लोक खाणे टाळतात. पण फायबर असल्याने मधुमेहींनी केळी खावी असा दावा अनेक अहवालांमध्ये केला गेला आहे. फायबरचे सेवन केल्याने रक्तातील साखर पातळी कमी करण्यास मदत होते.
 
हृदयविकारांसाठी - हृदयविकार असलेल्यांनी केळीचे सेवन अवश्य करावे. केळीत व्हिटॅमिन-सी, फायबर, पोटॅशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे लोक उच्च फायबरयुक्त आहार घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.
 
पचनसंस्थेसाठी - केळीत फायबर तसेच पाण्याची कमतरता भरुन काढणारे गुणधर्म असतात जे पचनाच्या आरोग्याला चालना देतात. केळीत फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अतिसाराच्या रुग्णांना याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जास्त फायबर असलेले पदार्थ, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) असलेल्या लोकांमध्ये गोळा येणे, गॅस आणि पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.