शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

Home Remidies : फिटकरी (तुरटी)चे खास गुण

तुरटीचा प्रयोग खास करून पावसाळ्यात पाण्याला स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुरटीला लोक वर्षांपासून कामात घेत आहे. आणि ही सर्वांच्याच घरी प्रयोगात आणली जाते. तर त्याचे गुण जाणून घ्या -  
 
ही लाल आणि पांढर्‍या रंगाची असते. जास्त करून पांढर्‍या तुरटीचा प्रयोग जास्त केला जातो.  
 
ज्या लोकांच्या शरीरातून जास्त घाम निघतो त्या लोकांनी अंघोळ करताना पाण्यात थोडी फिटकरी घालून त्या पाण्याने अंघोळ केली तर घाम येणे कमी होते.  
 
हिवाळ्यात पाण्यात जास्त काम केल्याने हातांच्या बोटांमध्ये सूज व खाज येते यापासून बचाव करण्यासाठी थोड्या पाण्यात तुरटी घालून उकळून घ्या आणि या पाण्याने बोट धुतल्याने सूज व खाजेवर आराम मिळतो.  
 
जर जखम झाली असेल आणि त्यातून रक्त वाहत असेल तर जखमेला तुरटीच्या पाण्याच धुऊन त्याचे चूर्ण बनवून लावल्याने रक्त येणे थांबते.

तुरटी आणि काळ्या मिर्‍याची पूड दातांवर लावल्याने दाताचे दुखणे थांबण्यास मदत मिळते.  
 
शेविंग केल्यानंतर चेहर्‍यावर तुरटी लावल्याने चेहरा मऊ होतो.  
 
अर्धा ग्रॅम तुरटीच्या पुडाला मधात मिसळून चाटल्याने दमा आणि खोकल्यात आराम मिळतो.  
 
भाजलेली तुरटी 1-1 ग्रॅम सकाळ संध्याकाळी पाण्यासोबत घेतल्याने रक्ताच्या उलट्या येणे बंद होतात.  
 
दररोज दोन्ही वेळा तुरटीला गरम पाण्यात घोळून गुळण्या करावे, याने दाताचे किडे तथा तोंडाची दुर्गंधी दूर होते.  
 
टांसिलचा त्रास असल्यास गरम पाण्यात चुटकीभर तुरटी आणि मीठ घालून गुळण्या करावे. याने टांसिलचा त्रास लवकरच दूर होतो.  

एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम तुरटीचे चूर्ण घोळून घ्या. या पाण्याने रोज डोकं धुतल्याने डोक्यातील ऊआ मरतात.  
 
दहा ग्रॅम तुरटीच्या चूर्णात पाच ग्रॅम काळे मीठ घालून त्याचे दंतमंजन तयार करून घ्या. या दंतमंजनाचा रोज प्रयोग केल्याने दातांच्या दुखण्यात आराम मिळतो.  
 
कानात जर फोड किंवा पू येत असेल तर एका कपात थोडीशी तुरटी वाटून पाण्यात घोळून घ्या आणि पिचकारीने कान धुऊन घ्यावा.  
 
मधात फिटकरी मिसळून डोळे धुतल्याने डोळ्याच्या लालपण कमी होण्यात मदत मिळते.