Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज घरी "ती" आहे म्हणून...

Updated: बुधवार, 26 जून 2019 (10:03 IST)
 
खांद्यावरची बॅग सावरली, अन दुधाची पिशवी दुसऱ्या हातात घेतली. येताना पानवाल्याकडून आठवणीनं सिगरेटच पाकीट घेतलं, त्याला ब्रँड माहितीच होता, मी म्हणायच्या आत त्यांन ते हातात सोपवलं. डबाबलेल्या चेहऱ्यांनी घरी पोहचलो. कुलूप काढायच्या आतच दार उघडलेलं बघून थोडासा बावरलो. 
 
हळूच पाऊल टाकलं तर स्वर्गात आल्या सारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच घरी शिरलो काय म्हणून हि गडबडलो. पण तर दोरीवरच बनियन आपलंच हे ओळखून स्थिरावलो, आता बनियन मध्ये कसली आली ओळख पण चार जागी होल अन विकत घेताना पांढरा असलेला कलर आता पिवळा जाहीर करावा असा त्याचा अवतार यावरून आपलंच असं खुणावत राहिलं. 
 
दबकत जरा आत गेलो, फ्रीज उघडला तर थंड हवा चेहऱ्यावर पसरली. कोपऱ्यात बसलेलं लोणच खुद्कन दिसलं. निवडलेली मेथी अन कोथिंबीर पण कोवळी हसली. सकाळी जागा नसलेला फ्रीज आता सुटसुटीत कसा? मग हळूच आणलेली वांगी अन पडवळ यांना जागेवर बसवलं. रूमकडे पावलं टाकीत गेलो, तर काहीतरी सुगधं दरवळला. आठवडा भर पाणी न भेटलेले देव चमकताना हसले उदबत्तीचा सुगंध माझ्या पाठी पाठी येताना भासला.
 
बॅग अलगद खुर्ची वर ठेवली. साधारण कधी तोंड न दिसणारी सगळ्यांच ओझं वाहणारी ती मोकळी कशी वाटली. जाताना बेड वर स्थापलेला टॉवेल खिडकीत हवा खाताना दिसला. कपाट उघडलं, तर धस्स झालं अन सगळे घडी वाले कपडे बघून डोळेच दाटून आले. रुमालावर रुमाल कसा बसला होता, सकाळी सापडत नव्हता तो म्हणून वेगवेगळा घातलेला सॉक्स आता कोपऱ्यात बसून माझ्याकडेच बघत होता. लाल पिवळा निळा असे शर्ट हँगर ला अडकलेले दिसले, तेव्हा मागच्या वाढदिवसाला तिनं भेट दिलेला जांभळा टी शर्ट देखील सापडला. 
 
हळूच येऊन बसलो टीव्ही समोर तर परवा पासून असलेले चहाचे डाग टीपॉय वरून गायब कसे झाले?? एरवी नाममात्र टीपॉय रद्दीच दुकान आज मोकळा ढाकला हसला. धुळीन काबीज केलेली टीव्ही पण चमकत होती कारण माझी बावरलेली नजर त्यात स्पष्ट होत होती. दोन मिनिटं गरगरलंच, म्हणून पाणी प्यायला गेलो, तर एरवी नुसत्या लसणाच्या फोडणीवर चाललेलं किचन आज खमंग भजी अन कटाची आमटी यांच्या वासान मंत्र मुग्ध झालेलं. 
 
भावना आवरून मग बाहेर आलो डोळे मिटून क्षणभर विचार करत बसलो. मग डोळे उघडून चिमटा काढत स्वप्न तर नाही म्हणून स्वतःलाच प्रश्न केला, तेवढ्यात गरम गरम भजी अन वाफाळता चहा कुणीतरी समोर धरला गिळला गेला आवंढा, आपसुक अहंकार गळून पडला. एरवी थकून आलो म्हणून दही भातावर भागवणारा मी, आज आयाता आल्याचा कडक चहाचा स्वाद घेत होता. न कळत अश्रू पडले दोन गालावर, जरासं सावरलं तेव्हा लक्षात आलं....आज घरी "ती" आहे म्हणून...
 
जीच्यामुळं जगात समृद्धी अन सौख्य आलं बस कुणासाठी तरी ती... आई आहे, कुणाची बायको तर कुणाची बहीण अन कुणासाठी मुलगी आहे. तेव्हा पटलं मनाला, पठ्ठ्या किती हि मोठा हो पण लक्षात ठेव टायबुटातल्या शहाण्या.. जगातल्या प्रत्येक "तुला" सावरायला एकतरी "ती" लागतेच कारण....प्रत्येक घराला घरपण येण्यासाठी घरात एक तरी बाई असावीच लागते...असावीच लागते.....!!!

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अभिनेते शरद केळकर पुढे आले

रणबीर कपूरचा नवा अवतार! लव्ह अँड वॉर'चा फर्स्ट लूक १५ ऑगस्टला समोर येण्याची शक्यता

World Cat Day : या बॉलिवूड अभिनेत्री मांजरांवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या 'कॅट मॉम्स' आहेत

अनिल कपूर लवकरच 'इंडियाज टॉप 1Percent' हा नवीन गेम शो घेऊन येत आहेत

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

पुढील लेख
Show comments