शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (11:16 IST)

आपण नेमके कोण आहोत?

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष आहेत. यांनाच "षडरिपु" असे म्हणतात. 
 
फार्सी भाषेत त्यांना "आएब" असे म्हणतात. हे सहा आएब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब असे म्हणतात.
 
या सहा दोषांना सहज धारण करणारास साधारण म्हणतात.
 
या सहांना मान्य करणारास सामान्य म्हणतात.
 
या सहांना आपल्या धाकात ठेवणारास  साधक म्हणतात.
 
या सहांना अधू करणारास साधू म्हणतात.
 
या सहांचा संपूर्ण अंत करणारास संत म्हणतात.
 
आणि या सहांचा अर्थ नीट समजून  घेऊन स्वत:ची आत्मोन्नती  करतो त्याला समर्थ म्हणतात.