गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जुलै 2018 (02:48 IST)

अजून तोच पावसाळा, तोच आहे पाऊस....

हाती चहा पेला, अन् बाहेर पाऊस ओला
भजी गरम कांद्याची, तुम्ही येता का बोला
 
करू पावसाळी गप्पा, गाऊ पाऊसगाणी
बालपण, पावसाची आठवू कहाणी
 
अजून तोच पावसाळा, तोच आहे पाऊस
आपण फक्त मोठे झालो, विसरलो हौस
 
पुन्हा पावसात सोडू आपण कागदहोडी
एकमेकां भिजवून करू बालखोडी
 
चिखलात रोवू पाय, माती गोड स्पर्श
मोठेपणी टिपून घेऊ, तोच बालहर्ष
 
निरागस भिजण्याचा घेऊ अनुभव
पावसाच्या थेंबाची चाखू गोड चव
 
अंगावर लेवू पाऊस, विसरून भान
आजही तो आपल्याला करेल लहान
 
बंद दार मनातले हळूचकन् खोला
वाट पाहतोय आपली बाहेर पाऊस ओला...