गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जुलै 2018 (15:26 IST)

गुरूपौर्णिमा : बिन भिंतीची उघडी शाळा

बिन भिंतीची उघडी शाळा
 
लाखो इथले गुरू...!
 
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे 
यांशी गोष्टी करू!
 
बघू बंगला या मुंग्यांचा, 
सूर ऐकुया या भुंग्यांचा
 
फुलाफुलांचे रंग दाखवील 
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!
 
सुगरण बांधी उलटा वाडा, 
पाण्यावरती चाले घोडा
 
मासोळीसम बिन पायांचे 
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!
 
कसा जोंधळा रानी रुजतो, 
उंदीरमामा कोठे निजतो
 
खबदाडातील खजिना त्याचा 
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!
 
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, 
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
 
मिळेल तेथून घेउन विद्या 
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!
 
– ग. दि. माडगूळकर (गदिमा)
 
"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"