रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जुलै 2018 (13:24 IST)

अर्जुनला घेऊन 'नो एन्ट्री'चा सिक्वल बनवणार बोनी कपूर

मागील काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीत बोनी कपूर निर्मित आणि सलमान खान अभिनित 'नो एन्ट्री' या चित्रपटाचा सिक्वल बनणार असल्याची चर्चा सुरू होती. 'नो एन्ट्री'च्या सिक्वलमध्येदेखील सलमान खान झळकेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण बोनी कपूर आता मुलगा अर्जुन कपूरला घेऊन हा चित्रपट बनवणार असल्याची सध्या चर्चा आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 'नो एन्ट्री'च्या कथेवर सध्या काम सुरु असून नव्या कलाकारांची गरज कथेची गरज म्हणून लागणार आहे. नव्या कलाकारांच्या नावाची चर्चा असली तरी बोनी कपूर यांचे यादरम्यान पुत्र प्रेम जागे झाले असून जर असे झाले असेल तर 'नो एन्ट्री'च्या सिक्वलमध्ये अर्जुन कपूर दिसेल एवढे मात्र नक्की. अद्याप 'नो एन्ट्री'च्या शूटिंगला वेळ असून बोनी कपूर सध्या एका चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. ते हा चित्रपट अजय देवगणसोबत करीत आहेत. त्यानंतर 'नो एन्ट्री'च्या सिक्वलचे शूटिंग सुरू होईल. कलाकारांच्या नावाची घोषणा कधी होते आणि सलमानच्याऐवजी अर्जुन मुख्य भूमिकेत असणार का ? या प्रश्र्नाचे उत्तर मिळणार आहे.