मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (08:44 IST)

‘भारत’चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

First Look of the 'bharat' film
सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भारत’चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जाफरनं या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ‘आगीचं रिंगण आणि भारत’असं लिहित जाफर यांनी पाहिलं पोस्टर शेअर केलं आहे. 
 
या चित्रपटात ६० वर्षांपूर्वीची सर्कस पाहायला मिळणार आहे. भारतमध्ये अभिनेत्री दिशा पटानी ट्रॅपिझ आर्टिस्टच्या भूमिकेत असणार आहे. सलमानसह दिशा या चित्रपटात सर्कशीतील वेगवेगळ्या कसरत करताना पाहायला मिळणार आहे. यासाठी दिशा खास प्रशिक्षणही घेत आहे.‘भारत’साठी सलमाननं वजनही घटवलं आहे. तो या सिनेमात विविध रुपात पाहायला मिळणार आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या Ode to My Father या चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे. या चित्रपटात प्रियांकाही मुख्य भूमिकेत आहे.