मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (16:53 IST)

सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनला संजूबाबा!

बॉक्स ऑफिसवर संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' या चित्रपटाने दमदार कमाई केली असून संजयच्या लोकप्रियतेमध्ये या चित्रपटामुळे वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर संजय दत्तने स्कोर ट्रेंड्‌स इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून स्थान काबीज केले आहे. अभिनेता सलमान खानला 61 गुणांसह सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनलेल्या संजय दत्तने प्रसिध्दीत मागे टाकले असून त्याचबरोबर 'संजू' या चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूरलाही प्रसिध्दीचा फायदा झाला असून 44 गुणांसह रणबीर कपूर तिसर्‍या स्थानावर पोहोचला असल्यामुळे लोकप्रियतेमध्ये रणबीरनेही अक्षयकुमार आणि बिग बींनाही मागे टाकले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये न्यूज प्रिंट, आणि डिजिटल विश्वासत 'संजू' चित्रपटाच्या प्रमोशनमुळे संजय दत्तविषयी भरपूर लिहिले गेले आहे. संजय दत्तविषयी सोशल मीडियावरसुध्दा भरपूर चर्चा झाली. 
 
संजयची लोकप्रियताही 'संजू' चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे एवढी वाढली की गेल्या काही आठवड्यांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सलमान खानला मागे टाकत, संजय दत्त सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला, असे स्कोर ट्रेंड्‌सचे सह-संस्थापक अशवनी कौल यांनी सांगितले.