शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (12:24 IST)

मराठीत "लागण्याची" गंमत बघा

बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. 
तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला "लागला".
त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच "लागला" होता. 
बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला "लागला". 
घरचे जेवायचा आग्रह करू "लागले". मला जेवणात गोड "लागतं" हे माहिती असल्याने गोड केलं होतं. 
भात थोडा "लागला" होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला "लागली". पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार "लागली".
निघताना बस फलाटाला "लागली"च होती, ती "लागली"च पकडली. 
पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस "लागली". मग काय ...
घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी "लागली" कारण आल्या आल्या घाईची "लागली".
थोडक्यात माझी अगदी वाट "लागली"..
घरची मंडळी हसायला "लागली".