suvichar
✕

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या टेबलावरील संवाद

Updated: शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (13:04 IST)
 
१ - अगं बाई, प्रमोशन बिमोशन झालं की काय?
 
२ - नाही गं, कसलं आलंय प्रमोशन, ते काहीतरी अवार्ड मिळालं म्हणे कंपनीला, नाव विसरले बघ, असो.. तर हे म्हणाले आज दुपारचा डबा नको.. 
 
१ - अगं बाई, म्हणजे सकाळचा वेगळा डबा नेतात की काय?
 
२ - चल, काहीही तुझं, पुढं ऐक, मग मी म्हटले बरं झालं आधी सांगितलं.. काम वाचलं माझं. नाहीतर आपण सकाळी उठून सगळं करायचो आणि हे ऐनवेळी डबा नको म्हणतात.. शिवाय यांच्या भाज्या ठरलेल्या बटाटा, मेथी, शेपू, बेसन, मटकी. जरासं वेगळं काही करायचं म्हटलं की यांचं तोंड कारल्याहून वाकडं
 
१ - अगदी खरंय, आमच्याकडेही हीच तऱ्हा. पोरांचे वेगळे कौतुक आणि यांचे वेगळे नखरे.. 
 
२ - हो ना, जीव दमून जातो नुस्ता. आमच्या ह्यांनाही गवार आवडत नाही ना, म्हणून मग मी आज केली डब्याला. अशीही पडून राहते आणि भाज्या किती महाग झाल्यात, त्याचं काय पडलंय कुणाला
 
१ - आणि रोज रोज काय नवीन करायचं अगं.
.
२ - नाहीतर काय.. आणि तू काय आणलं? 
 
१ अगं काल रात्री आवरायला खूप वेळ गेला, झोपायलाही उशीर झाला आणि नेमकं आजच आमच्या सासूबाईंना जायचं होतं बाहेर सक्काळी सक्काळीच, म्हणून जरा जास्त लवकर उठावं लागलं.. त्यात लाईटही गेले, सगळं पाणी गॅसवर ठेवावं लागलं, पोरांनाही उशीर झाला नेमका स्कुलला
 
२. आत्ता गं बाई..
 
१. हो ना, आणि यांची फर्माईश आली.. मेथीचे पराठे कर.. मग काय केले आणि भाजीही केली थोडी.. तीच घेऊन आले...
.
.
.
.
.
 
 
 
संपलं नाहीये अजून... 
संपत नसतं हे कधी.....

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नंट? मुंबईतील कीर्तनात विराटसोबतच्या व्हिडिओंमुळे चर्चांना उधाण

अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील 'कूल' अंदाज; AI व्हिडिओ सोशल मीडियावर उडवली खळबळ

ऑस्कर नॉमिनेटेड अभिनेत्रीचे दुःखद निधन; १२ वर्षांपासून आजाराशी झुंज देत होत्या

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

Karwa Chauth 2026: देशातील प्रमुख राज्ये जिथे करवा चौथ मोठ्या प्रमाणावर साजरे होते

पुढील लेख
Show comments