Festival Posters
✕

'आई मी एक डाळिंब काढू का?'

Updated: सोमवार, 5 जुलै 2021 (19:24 IST)
तारामती झाडाला दररोज पाणी घाली
ते झाड हळूहळू मोठे झाले
एके दिवशी तिला एक फूल दिसले
तिला फार आनंद झाला
तिने ते आईला दाखवले
आई म्हणाली,
'आता काही दिवसांनी डाळिंब येईल.
तू दररोज पाणी घाल हं.'
झाडावर आणखी खूप फुले आली
हळूहळू डाळिंबे पण दिसू लागली
एकदा तारामतीने आईला विचारले,
'आई मी एक डाळिंब काढू का?'
आईने सांगितले,
'जरा थांब, आणखी थोडे दिवस वाट पाहा.'
आणखी काही दिवस गेले
आईला दो तयार डाळिंबे दिसली
ती खूप मोठी होती
ती आईने काढली
मग एक फोडून तिने तारामतीला दाणे दिले.
तारामती म्हणाली
'आई, आई, किती गोड आहे हे डाळिंब?'
'आपल्या शेजारची यमू आजारी आहे
ती काल आईजवळ डाळिंब मागत होती.
आपली डाळिंबे गोड आहेत
आई, हे डाळिंब मी यमूला देऊ का!
तिला ते फार आवडेल.
आणि ती लवकर बरी होईल'
हे ऐकून आईला समाधान वाटले
तिने ते डाळिंब तारामतीला दिले
मग तारामतीने ते यमूला दिले
दाणे खाताना यमूला फार आनंद वाटला.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

केसांना शॅम्पू लावण्यापूर्वी या ५ टिप्स जाणून घ्या

सॅलडमध्ये काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे हानिकारक होऊ शकते जाणून घ्या सत्य

लैंगिक आणि पोटाच्या आजारांमध्ये फायदेशीर आहे जानुशिरासन फायदे जाणून घ्या

हितोपदेशातील मनोरंजक कथा : कावळा, हरीण आणि कोल्ह्याची गोष्ट

ढाबा स्टाईल कुरकुरीत मिस्सी रोटी घरीच बनवण्यासाठीची सोपी रेसिपी Dhaba style Missi Roti

पुढील लेख
Show comments