बाहुली माझी धाकुली Marathi Poems for Kids
बाहुली माझी धाकुली
नाव तिचे छकुली
रंग तिचा कसा?
गोरा गोरा पान
हात-पाय मऊ किती?
छान छान छान
केस तिचे कसे?
काळे काळे काळे
डोळे तिचे कसे?
निळे निळे निळे
ओठ बघा किती
लाल लाल लाल
बाळासंगे छकुली
चाल चाल चाल
