रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 मे 2021 (12:39 IST)

मराठी कविता वेडं कोकरू

वेडं कोकरू
खूप थकलं
येताना घरी
वाट चुकलं!
 
अंधार बघून
भलतंच भ्यालं
दमून दमून
झोपेला आलं!
 
शेवटी एकदा
घर दिसलं
वेडं कोकरू
गोड हसलं!
 
डोकं ठेवून
गवताच्या उशीत
हळूच शिरलं
आईच्या कुशीत!
 
-मंगेश पाडगावकर