मराठी कविता : हरखणे
फुला-पाखरांना वेगळाच रंग
फळा-पानांना आगळाच गंध
पक्ष्यांच्या कंठात अनिवार स्वर
पावसाच्या धारात अनावर लय
नदीच्या पाण्याला वेगळीच ओढ
समुद्राच्या लाटेला आगळीच मोड
पर्वताच्या शिखरावर अनाम धून
सूर्याच्या किरणात संजीवक गुण
अणुरेणूतील ही स्पंदने
सामोरी अवघी आवाहने
हाती फक्त हरखणे.
डॉ. सौ. उषा गडकरी