शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (20:39 IST)

kitchen tips जेवण स्वादिष्ट बनवण्यासाठी हे करून बघा

पुलाव, जिरा राइस, किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त 2 शिट्या कराव्यात. भात फडफडीत होतो.
 
एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो. पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालते तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो.
 
कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणीक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ्ड पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खा.
 
दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाला आला असेल तर त्यात 5-6 पालकाची पाने बरीक चिरून घाला. आमटीला वेगळी चव येईल.