Festival Posters
✕

थंड झाल्यावरही पोळ्या मऊ राहतील जर या प्रकारे तयार कराल

Updated: बुधवार, 14 जुलै 2021 (11:44 IST)
 
पोळ्या तयार करण्यासाठी मऊ मळलेले पीठ असावं ज्याने पोळ्या नरम बनतात. घट्ट पिठाच्या पुर्‍या चांगल्या लागतात.
 
कणीक मळण्यासाठी, ते एका परातीत घेऊन त्याच्या मध्यभागी एक मोठा गड्डा तयार करावा. यात पाणी घालून कोपर्‍यापासून पिठ आत घेत-घेत कणीक मळावी. आवश्यकतेप्रमाणे पाणी शिंपडावं.
 
हाताने पीठ मळून घ्यावं. पाणी इतकंच टाकवं ज्याने ते भांड्याला चिकटू नये. अती घट्ट ही नसावं. मळलेली कणिक इतकी मऊ असावी की बोटाने दाबल्यास सहज दाबता येईल.
 
या पीठावर थोडे तूप किंवा तेल लावा आणि ते कपड्याने 15-20 मिनिटे झाकून ठेवा. असे केल्याने पीठाचा वरचा थर कोरडा होणार नाही.
 
ठराविक वेळेनंतर पुन्हा एकदा कणिक मळून घ्या. एक लाटी करुन त्याला कोरडं पीठ लावून लाटून घ्यावी. गोल पोळी तयार करण्यासाठी लाटी घेऊन हाताने जरा दाबावी. नंतर गरजेप्रमाणे अधून-मधून पीठ लावत मध्यभागी दाबत लाटत जावी. 
 
पोळी तयार झाल्यावर अधिक वेळ पोलपाटावर ठेवू नये. असे केल्याने पोळी फुगत नाही. पोळी तव्यावर टाकण्यापूर्वी हाताने झटकून त्यावर अतिरिक्त पीठ काढून घ्यावं. 
 
तव्यावर पोळी घालताना त्यावर सैल पडू नये याची काळजी घ्यावी. पोळी एकसारखी पसरली पाहिजे. तवा आधी गरम करुन मग आच मंद करुन घ्यावी.
 
आता पोळीला मंद आचेवर एका बाजूने हलकी शेकून घ्या. नंतर पालटून दुसर्‍या बाजूने जरा अधिक वेळ शेकून घ्या.
 
नंतर पोळी तव्यावर काढून थेट फुल गॅसवर शेकावी. कमी शेकलेला भाग शेकावा ज्याने पोळी निश्चित फुलते. पोळ्या शेकताना आच कमी असेल तर पोळ्या मऊ राहणार नाही. अशात आवश्यकतेप्रमाणे आच मध्यम-तेज करत राहा.
 
काही लोक पोळ्या मऊ होण्यासाठी कणिक मळताना त्यात दही किंवा दूध देखील मिसळतात.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

चिवडा खमंग होण्यासाठी पोहे कसे भाजावेत? तेलकट न होणाऱ्या चिवड्याची कृती

कारले खाताना करू नका या चुका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

बारावीनंतर किंवा पदवीनंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करा; कोर्सेस आणि नोकरीच्या संधी जाणून घ्या

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

पुढील लेख
Show comments