शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (15:32 IST)

फ्रिजमधील लिंबू 10 दिवस कसे ताजे ठेवाल जाणून घ्या टिप्स

लिंबू शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. लिंबामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळतो. याव्यतिरिक्त, यात भरपूर फॉस्फरस,कॅल्शियम,पोटॅशियम,झिंक,मॅग्नेशियम देखील आहे. जे शरीरातील वेगवेगळ्या घटकांची कमतरता पूर्ण करतात.परंतु लिंबू जास्त दिवस ठेवू शकत नाहीत. कारण ते खूप लवकर खराब होतात.परंतु अशा काही सोप्या युक्त्या आहेत ज्यांना अवलंबवून आपण लिंबू जास्त दिवस ठेऊ शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 लिंबू खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की लिंबाची साल पातळ आणि पिवळे असावे. जास्त जाड असल्यास त्यातून रस निघत नाही.त्यांना उन्हात ठेवू नका.लिंबू धुतल्यावर कागद किंवा टिश्यू पेपर मध्ये गुंडाळा.सर्व लिंबू वेग वेगळे ठेवा.नंतर एका भांड्यात ठेऊन फ्रिजमध्ये ठेवा.
 
2 आतापर्यंत आरओचे पाणी केवळ आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जात असे, परंतु ते इतर कामांमध्येही उपयुक्त आहे.लिंबू आरओ च्या पाण्यात बुडवून डबाबंद करून ठेवा,नंतर 5 दिवसाने यातील पाणी बदलत राहा. असं केल्याने आपण लिंबू कमीत कमी 20 दिवस वापरू शकाल.
 
3 लिंबात लवकर डाग लागत असल्यास त्यावर नारळाचं तेल लावून एखाद्या भांड्यात न झाकता ठेऊन द्या.नंतर हे भांडे फ्रिजमध्ये ठेवा.असं केल्याने आपण लिंबाचा वापर 15 दिवस पर्यंत करू शकता.