1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified रविवार, 4 जुलै 2021 (09:30 IST)

कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सायटोमेगॅल्व्हायरस आजार आढळून आले,लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे परंतु त्याचा परिणाम बर्‍याच काळासाठी दिसून येत आहे.कोविड -19 मधून बरे झाल्यानंतर लोक विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत.एवढेच नव्हे तर कोविड -19 पासून ग्रस्त झाल्यावर लोक मधुमेहाच्या आजाराला बळी पडत आहे. 
 
आता पर्यंत कोरोनापासून बरे झाल्यावर फंगल संसर्ग,रक्त साकळणे, सायटोकाईन,हॅप्पी हायपॉक्सिया इत्यादी आजार व्यापत होते.परंतु आता एक आणखी नवीन आजार समोर आले आहे रेक्टल ब्लीडिंग.हे सायटोमेगॅलोव्हायरसशी संबंधित आहे.  
 
दिल्लीत या आजाराचे 5 प्रकरणे समोर आले आहे,या मध्ये एकाला आपले प्राण गमावले लागले आहे.चला या आजाराबद्दल माहिती त्याची लक्षणे आणि उपचार काय आहे जाणून घेऊ या.
 
कोविड पासून बरे झाल्यावर अवघ्या 20 ते 30 दिवसातच संक्रमित लोकांमध्ये हा आजार आढळून येत आहे.
 
सायटोमेगॅलोव्हायरस ची लक्षणे -
 
* दीर्घकाळापर्यंत ताप येणे.
 
* थकवा आणि अस्वस्थता जाणवणे.
 
* घशात खवखव होणे.
 
* स्नायूंमध्ये आणि सांध्यात वेदना होणं.
 
* भूक न लागणे किंवा कमी लागणे.
 
* ग्रँथींमध्ये सूज येणे.
 
* मेंदूत सूज येणे.
 
* वजन कमी होणे.
 
* श्वासाच्या तक्रारी होणं.
 

सायटोमेगॅलोव्हायरस होण्याची कारणे- 
 
हा रोग द्रवपदार्थाद्वारे पसरतो. जसे की रक्त,लाळ किंवा शरीरातील इतर द्रव कोविड -19 प्रमाणे हेही संक्रमित होते. हा रोग एकमेकांमध्ये देखील पसरतो.
 

उपचार-
* या रोगापासून प्रतिबंधात्मक उपचार शक्य आहे.हा आजार अशा लोकांना प्रभावित करत आहे ज्यांना स्टिरॉईड्सचे डोस जास्त प्रमाणात दिले आहेत. तसेच त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे.
 

* या रोगापासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून संशोधन चालू आहे. सध्या यावर कोणतेही अचूक उपचार नाही,परंतु अँटीवायरल औषधांच्या मदतीने या रोगाचा प्रसार होण्यापासून रोखला जाऊ शकतो.