जास्त प्रमाणात साखर खाणे देखील,आरोग्यासाठी हानिकारक आहे जाणून घ्या
आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर सावधगिरी बाळगा, असे करणे आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकत.साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हे 7 आजार होण्याची शक्यता असते.
1 लठ्ठपणा हा सर्वात सामान्य परंतु गंभीर आजारच नाही तर बर्याच रोगांचे मूळ देखील आहे.जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपल्या शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो या मुळे शरीरावर चरबी जमा होते,आणि लठ्ठपणा आपल्याला वेढतो.
2 साखर जास्त प्रमाणात घेतल्याने याचा थेट परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो आणि प्रतिकारक शक्ती कमकुवत होते.या मुळे अनेक आजार उद्भवतात.
3 साखरेत कॅलरीच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही पोषक घटक नसतात.जे आपल्या शरीरात ऊर्जा वाढविण्यास काही मदत करतील.आपण साखरेचे प्रमाण जास्त घेतल्यावर काही वेळातच ऊर्जेची कमतरता आणि आळशीपणा जाणवतो.जर ही स्थिती दीर्घकाळापर्यंत राहिली तर हे घातक ठरू शकत.
4 जास्त प्रमाणात साखर घेतल्याने आपल्या लिव्हरचे काम वाढते.आणि शरीरात लिपिडचे निर्माण जास्त होते.अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर रोगासारख्या समस्या होण्याचा धोका वाढतो.
5 जास्त प्रमाणात साखर घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. जी मेंदूसाठी नुकसानदायक आहे.या परिस्थितीत मेंदू पर्यंत ग्लुकोज पोहोचत नाही आणि मेंदू व्यवस्थितरित्या काम करत नाही.या मुळे स्मृतीभंश देखील होऊ शकतो.
6 वेळेच्या पूर्वी वृद्ध होणे देखील साखरेचे प्रमाण जास्त घेतल्याचे दुष्परिणाम आहेत.जेव्हा आपण साखर जास्त खातो तर ही साखर शरीरात जाऊन इंफ्लेमेट्री प्रभाव करते या मुळे त्वचेवर पुरळ होणं,वृद्धत्त्व,आणि सुरकुत्या होणे सारखे त्रास उद्भवतात.
7 साखरेचे जास्त प्रमाण घेतल्यावर हृदय विकाराचा झटका किंवा हार्ट स्ट्रोक सारखे त्रास देखील होऊ शकतात,कारण हे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढवतात.जे हृदयासाठी घातक आहे.