बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (18:07 IST)

मधुमेहासाठी घातक आहे कोरोना, लक्षण आणि उपाय जाणून घ्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही सुरू आहे.लसीकरण,मास्क लावणे , सामाजिक अंतर राखणे आणि हात धुणे हे कोरोना टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहेत.या उपायांचे प्रत्येकाने सतत अनुसरण करणे आवश्यक आहे. हा विषाणू लोकांपर्यंत कसा पोहोचत आहे याबद्दल अद्याप शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे पुष्टी केलेली नाही,तरी या वरचे संशोधन सुरु आहे. सामान्य लोक कोरोनापासून बरे होत आहेत, परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा रोग जीवघेणा ठरत आहे.
 
कोरोना बाधितांना डॉक्टर स्टिरॉइड औषधे देत आहे.या मध्ये साखरेच्या पातळीची विशेष काळजी घेतली जात आहे.रुग्णानुसार डॉक्टर रुग्णाला हे औषधे लिहून देतात. हे औषध अचानक थांबविले जात नाही.हळू हळू औषधाचे डोस कमी करून बंद केले जाते.या दरम्यान मधुमेहाच्या रुग्णांना वेळच्यावेळी साखरेची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
 
मधुमेहाच्या रुग्णांमधील धोकादायक लक्षणे-
 
1 ब्लॅक फंगस होण्याचा धोका.
 
2 न्यूमोनिया होण्याचा धोका.
 
3 रोग प्रतिकारक क्षमता कमकुवत होणं.
 
4 हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका 
 
5 व्हेंटिलेटरची आवश्यकता पडणे.
 
 
* मधुमेहाच्या ज्या रुग्णांना कोरोना झाला नाही त्यांनी या 5 गोष्टींची काळजी घ्यावी-
 
1 शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
 
2 सकाळ-संध्याकाळ किमान 40 मिनिट व्यायाम करणे आवश्यक आहे.
 
3 दर तासाला 10 मिनिटे उभे राहा.तसेच घरातच फिरत राहावे.
 
4 खाण्यात प्रोटीनचे प्रमाण वाढवावे.
 
5 चेहऱ्याला आणि नाकाला कमीत कमी स्पर्श करा.