मुलांना लसी का देतात जाणून घ्या
प्रत्येक घरात मुलं असतात आणि आपण बघितले असणारच की मुलांना वेळोवेळी लसी देतात परंतु आपण हा विचार केला आहे का की मुलांना लसी का देतात ?चला तर मग जाणून घेऊ या.
लहान मुलांना लसी देण्यामागील कारण असे आहे की लसीकरण केल्याने न केवळ मुलांचा गंभीर आजारांपासून बचाव होतो .तर आजाराला इतर मुलांमध्ये पसरण्यापासून रोखतात.
लसी मुलांच्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करतात.आणि त्यांना जिवाणू आणि विषाणूंशी लढण्याची क्षमता देतात.वास्तविक ज्यावेळी शरीराचा विकास होत असतो त्यावेळी शरीर वातावरणापासून शरीराला विकसित करण्यासाठी बरेच पदार्थ ग्रहण करतात आणि त्या पदार्थांसह अनेक हानिकारक विषाणू देखील शरीरात प्रवेश करतात कारण लहान मुलांचे शरीर त्या विषाणूंशी लढण्यात सक्षम नसत आणि हे विषाणू मुलांच्या शरीरावर लवकर प्रभाव पाडतात.म्हणून लहान मुलांना त्या हानिकारक विषाणूंशी वाचण्यासाठी लसी दिल्या जातात.