मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:49 IST)

फ्रीजमधील खाद्य पदार्थ काढून खाण्यापूर्वी हे नक्की वाचा

शहराच्या व्यस्त जीवनात, कधीकधी आपल्याला भूक लागेल तेव्हा ताजे अन्न तयार करणे शक्य नसते. हे बर्‍याचदा काम करणार्‍या लोकांसोबत घडत असतं. व्यस्त राहणारे लोक वेळ वाचवण्यासाठी बरेचदा जास्तीचं अन्न शिजवतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. उरलेला आहार फ्रिजमध्ये साठवण्याचा उद्देश एकतर अन्नाची नासाडी रोखणे किंवा वेळ वाचविणे असतं. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न बिघाड रोखू शकते, परंतु हे आपले आरोग्य खराब होण्यापासून वाचवू शकते काय? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी, अन्न, फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी किती दिवस सुरक्षित आहे ते आम्हाला कळू द्या.
 
रेफ्रिजरेटरमध्ये शिजवलेलं तांदूळ 2 दिवसांच्या आत खावं. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेला भात खाण्यापूर्वी त्यास खोलीच्या तपमानावर काही वेळ ठेवावं. त्यानंतर भात व्यवस्थित गरम झाल्यावरच सेवन करावं.
 
जर तुम्ही गव्हाची पोळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असाल तर पोळ्या तयार झाल्यानंतर 12 ते 14 तासांच्या आत ते खाणे योग्य ठरेल. आपण हे न केल्यास, पौष्टिक मूल्य गमावण्यासह, यामुळे आपल्यास पोटदुखी देखील होऊ शकते.
 
जर खाण्यामध्ये डाळ उरली असेल आणि ती खराब होण्यापासून टाळण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवली असेल तर 2 दिवसांच्या आत त्याचे सेवन करा. 2 दिवसानंतर फ्रीजमध्ये ठेवलेली डाळ खाल्ल्यानंतर पोटात गॅस बनण्यास सुरवात होते.
 
कधीकधी कापलेली फळे उरतात. अशा परिस्थितीत लोक फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याचा वापर करतात. परंतु प्रत्येक फळ खाण्यासाठी एक निश्चित वेळ आहे. त्यानंतर फळ दूषित होतं. जर तुम्ही चिरलेली पपई फ्रिजमध्ये ठेवल्यास सहा तासांच्या आत वापरणे योग्य ठरेल. एकदा पपई कापल्यावर 8 तासांने दूषित होण्यास सुरवात होते. जर आपण ते 12 तासांनंतर खाल्ले तर ते तितकेच हानिकारक होते जितकं गुणकारी होतं. हे आपल्या शरीरासाठी मंद विषासारखे कार्य करू शकतं.
 
सफरचंद कापल्यानंतर बराच काळ ठेवल्यास त्यामध्ये ऑक्सिडेशन होण्यास सुरवात होते. यामुळे त्याचा वरचा थर काळं होऊ लागतं. तथापि, यात नुकसान नाही परंतु सफरचंद कापल्यानंतर ते 4 तासांत खाणे चांगले. तसे, जर आपण कोणतेही फळ कापले असेल तर ते 6 ते 8 तासांनंतर खाऊ नये. 
 
बर्‍याच काळासाठी फ्रीजमध्ये ताजे अन्न कसे ठेवावे
बर्‍याचदा लोक कच्च्या भाज्यांबरोबरच फ्रीजच्या त्याच शेल्फवर शिजविलेले अन्न ठेवतात. असे केल्याने बॅक्टेरिया फ्रीजमध्ये वाढू लागतात आणि अन्न लवकर खराब होऊ शकते. कच्च्या आणि शिजवलेल्या अन्नाला वेगवेगळ्या शेल्फमध्ये ठेवावं. भांडी झाकून ठेवल्याने अन्नाच्या बॅक्टेरिया शिजवलेल्या अन्नास दूषित करीत नाहीत. आपण शिजवलेले अन्न स्टीलच्या टिफिनमध्ये ठेवले तर चांगले होईल.