1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (17:24 IST)

बायको 12 वर्षा नंतर माहेरी जातेय

बस गच्च भरली होती. आता ती सुरु होणार तोच
ड्रायव्हर म्हणाला, “गाडीचा टायर पंक्चर आहे”
ताबडतोब कंडक्टर उतरला. 
त्याच्या मागोमाग पक्या उतरला, 
दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला, 
बस सुरु होण्यासाठी सज्ज झाली.
कंडक्टर पक्याला म्हणाला, “मी तुम्ही केलेल्या मदती
 बद्दल तुमचा आभारी आहे.
आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात
मदत करीत नाहीत, 
पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन
टायर चढवला. हातपाय ,कपडे खराब करून घेतलेत.
मी खरच खूप तुमचा मनापासून आभारी आहे.
पक्या  म्हणाला,” मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही . 
माझी बायको 12 वर्षा नंतर माहेरी जातेय, 
ती याच बस मध्ये आहे, 
टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीच
रद्द होऊ नये म्हणून केली ही सगळी खटपट.