मुर्गी मा काजू
(काजूसह कोंबडी-पारशी पद्धत)
साहित्य : 1 किलो कोंबडीचे तुकडे, 8 ग्रॅम आले, 12 पाकळ्या लसूण, 1 छोटा चमचा जिरे, 1/2 कप काजू तुकडे केलेले, 1 कप पाणी, 1/2 कप पाणी, 1/2 तेल, 2 कांदे उभे चिरलेले, 3 छोटे चमचे मीठ, 2 मोठे चमचे टोमॅटो केचप, 1 छोटा चमचा साखर. कृती : आले आणि लसणाचे वाटण करून कोंबडीवर चोळा. साधारण 1 तास मुरवत ठेवा. मिरच्या व जिऱ्याची पेस्ट करावी. नंतर काजूची वेगळी पेस्ट करावी. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. मिरचीचा ठेचा घाला आणि साधारणपणे 3 मिनिटे परता. कोंबडी घालून चांगले परता व पाणी टाकून चांगले मिसळून 5 मिनिट शिजवा. शिजल्यानंतर त्यात काजूची पेस्ट, टोमॅटो केचप आणि साखर घालून ढवळा. रस्सा जाड होईपर्यंत शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.