शुक्रवार, 19 जुलै 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (21:03 IST)

Marathi Kavita : वेदना काही दिसतात काही नाही दिसत

painting
वेदना काही दिसतात काही नाही दिसत,
वरवर बघता त्या कुणास नाही उमगत,
काही वेदना विव्हळायला भाग पडतात,
काही मात्र त्या व्यक्तीस अंतर्मुख करतात,
काळाच्या ओघात काहींची तीव्रता कमी होते,
कित्तीही काळ लोटला, तरीही काहींची तीव्रता तीच राहते,
आपलेच लोक न बोलता त्या देत राहतात,
परके ही कधी गंगेत हात धुवून घेतात,
चेऱ्यावर साफ दिसते वेदनेची सल आलेली,
काही मात्र जाणीवपूर्वक असते त्यानं लपवलेली,
हसण्याच्या मागची वेदना, फार मोठं प्रकरण असतं,
मुखवटे वेगळेच असतात, आत काही अलगच निघत.
पण काहीही झालं तरी वेदना या असतातच,
त्याच फक्त आपल्या असतात, अन त्या सोसाव्या लागतातच!
..अश्विनी थत्ते.