Dharma Sangrah
✕

भाज्यांच्या गप्पा

Updated: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (12:21 IST)
भाज्या भाज्यात हळू आवाजात
चर्च्या झाली सुरु
एकमेकीच्या मनातली
खद खद बाहेर आली

हिरवी ढोबळी मिरची म्हणली
" दोडक्या " कसं होईल ?
काय माहित गिऱ्हाईक कधी
आपल्याला घरी नेईल

गवार म्हणली ए कांद्या
तुझं मात्र बरंय
बारा महीने तुझी चलती
आमचं काय खरंय ?

कांदा म्हणला गवारताई
उपयोग काय त्याचा
आम्हाला फक्त तोंडी लावतेत
मुख्य मान तुमचा

दिसायला दिसतंय बुटकं
पण वांग्याला भलताच मान
काळ्या रस्याच्या भाजीला
सगळेच म्हणतेत छान

मेथी अन पालक बाई
नेहमीच हिरव्या साडीत
टमाट  म्हणतं मीच एकटा
चवीला असतो गोडीत

मला तर बाई काही काही येडे
उगीच वाळीत टाकतेत
शेपूची भाजी खाल्ली की म्हणे
वेगळेच ढेकरं येतेत

आलू , कोबी , डांगर पहा
किती जास्त लठ्ठ
भेंडी म्हणती बघा बघा
दिसते का नाही " फिट्ट " ?

शेवग्याची शेंग म्हणली
सरक तिकडं भवाने
चांगली उंची , रंग , रूप
दिलं मला देवाने

कार्ल म्हणलं मी तर आधीच
कडू म्हणून प्रसिध्द
आमची भाजी केली की
घरात होतं युद्ध

आंब्याचा थाट बाई
भलताच न्यारा दिसतो
बघ न कसा गाड्यावरती
एकदम ऐटीत बसतो

उन्हाळ्याच्या दिवसा मध्ये
लोकं ही येड्यावणीच करतेत
केशर , हापूस म्हणलं की
पटकन थैलीत भरतेत

मुडदा बाजारात आला की
दहशत निर्माण करतो
गरीब असो श्रीमंत असो
दररोज रस करतो

भाज्या म्हणल्या खरोखरच
खूप त्रास होतो
आंबा निघून गेला की
जीव भांड्यात पडतो

- Social Media

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

ऑनलाईन शॉपिंग करताना त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर कसे निवडावे ते जाणून घ्या

आहारात जास्त लोणी खाण्याची सवय आरोग्याला पडू शकते महागात; जाणून घ्या दुष्परिणाम

मुलं तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत? पालकांनी ‘या’ चुका वेळीच सुधारा

प्रेरणादायी कथा : सकारात्मक विचार; गोष्ट ऋषी आणि दोन शिष्यांची

लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत हे कसे ओळखाल? चाणक्य नीतीनुसार ५ स्पष्ट लक्षणे

पुढील लेख
Show comments