1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (16:28 IST)

"वागण्याची रीत माणसाची"

काय म्हणायचे तरी कुणाला त्याच त्याच गोष्टीं वरून,
काय करायचे ते ज्याने त्याने असतं मनात ठरवून,
आपण च चरफडतो मनातून खूपच,
ज्यांना जे करायचं ते करतो बसतो चुपच,
त्रागा आपला होतो, बोलणं दिसतं आपलं,
पण आपण तसंच वागलेलं, मात्र नसतं खपल,
आता मात्र डोक्यावरून पाणी जाईल असं वाटतं,
चुपच राहावं आपण, जे होईल ते साऱ्यांना दिसतं,
पहिलं स्थान आता मात्र त्यांना मिळणं नाही,
आपण ही आपला मार्ग जोखवा, आता तो प्रांत आपला नाही.
.....अश्विनी थत्ते