शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (15:54 IST)

बहावास त्यानं दिला पृथ्वीवर मान

tree
एकदा देवाने रुजविला कण सोन्याचा,
त्यातून बाहेर आला, वृक्ष बहाव्याचा,
दिसामासी तो दारी वाढू लागला,
कौतुकानं देव ही त्यास पाहू लागला,
झाला वृक्ष मोठा, अंगणी सावली त्याची आली,
एके दिवशी त्यावर, सोन्याची झुंबरे लागली,
कण  कांचनाचा रुजलाम्हणून की काय !
पिवळ धम्म रूप, पानो पानी तो ल्यायलाय.
देव झाला खुश, आंनदे दिलं त्यानं दान,
बहावा स त्यानं दिला पृथ्वीवर मान.
म्हणून बहावा करीत नाही तमा कुणाची. 
ऊन कित्ती ही असू दे, लटके झुंबरे सोन्याची!!
...अश्विनी थत्ते