शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

सावित्रीबाई फुले : जाणीव-जागृतीचे काव्य

सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. जी स्त्री क्रांतिबा जोतिराव फुले यांची पत्नी. त्यांच्या सहवासात व संस्कारात पन्नास वर्षे राहिली. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली. साक्षर झाली. जोतिरावांच्या मनात स्त्रीशिक्षणविषक विचार प्रबळ होऊ लागला. तेव्हा स्त्रियांना कसे शिकवावे, याचा वस्तूपाठ घेण्यासाठी काही दिवस अहमदनगरला जाऊन राहिली आणि एक प्रगल्भ शिक्षिका म्हणून 1852 सालीच सरकार दरबारी तिचा सन्मान झाला. जोतिरावांनी समाजाची दशा व दिशा सावित्रीला समजावून दिली. सावित्रीला स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्याचा वसा घेतला. दीनदलित स्त्रियांची गुलामगिरी तिला अस्वस्थ करीत होती. तिचे नाव भावनाळले. विचारांचा कल्लोळ उठला व ती कव‍ियत्री झाली. 

1854 साली तिचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो. फुले हे त्याच्या घराणचे नाव वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय. सावित्रीचे भावविश्व फुलांनी बहरून गेले. ‘पिवळा चाफा, जाईचे फुल, जाईची कळी, गुलाब फुल’ आदी त्यांच्या कवितांच शीर्षकावरून लक्षात येते. या संग्रहातील फुलाविषयीच्या कवितांचा आविष्कार अत्यंत आधुनिक आहे. आविष्कार पद्धती आधुनिक मराठी काव्यात फार पूर्वीपासून होती, व तिचा उगम सावित्रीबाईंच तारुण्सुलभ कवितेत आहे. 

कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई

या कवितेतून मानवी नराच्या भ्रमरवृत्तीवर प्रतिकरूपाने प्रकाश पाडला आहे. स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार केला आहे.

रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने
या कवितेतून मानवी भावभावनांचे दिग्दर्शन निसर्गप्रतिकातून सावित्री अचूकपणे व समर्थपणे करते. या संग्रहातील उरलेल्या कवितांपैकी काही कविता तिच्या शिक्षकी पेशातून निर्माण झालेल्या आहेत. जोतिरावांच्या सम्यक विचारातून स्फुरलेल्या आहेत. ‘स्वागतपार पद्य, बोलकी बाहुली, सादाकि पद्य, श्रेष्ठ धन, शिकणेसाठी जागे व्हा’ या कविता शिक्षणाशी संबंधित आहेत. जोतिबांना नमस्कार, जोतिबांचा बोध व सावित्री- जोतिबा संवाद या कवितेतून त्यांची पार्श्वभूम‍ी व नाटय़ अतिशय प्रभावी आहे.                                 काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।

                                                               सर्वा जागे केले। या सूर्याने ।।
                                                                       शूद्र या क्षितीजी।
                                                                         जोतिबा हा सूर्य ।।
                                                                  तेजस्वी अपूर्व। उगवला।।
अशी जोतिरावांना ‘ज्ञानसूर्य’ मानणारी महान कवयित्री अठराव्या शतकातील प्रेरक व प्रेरणादायी कवयित्री होती. 1811 साली जोतिरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी जोतिरावांचे एक पद्यमय चरित्र लिहिले आहे. त्याचे नाव ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्य चरित्रग्रंथ दस्तुरखुद्द सावित्रीनेच लिहिला आहे. फुले चरित्राबाबत तो अत्यंत विश्वसनीय दस्तऐवज मानला पाहिजे. या चरित्रग्रंथाला बावन्नकशी म्हटले आहे. त्यात बावन कडवी आहेत. लग्न झाले तेव्हापासून जोतिराव आपली पत्नी सावित्री आणि ‘आऊ’ सगुणाबाई यांनासुद्धा शिक्षणाचे पाठ देत असे हे चरित्र सांगते. म्हणूनच या चरित्रकाव्यग्रंथात कृतज्ञतेची भावना अभिव्यक्त झालेली आहे.

- प्रमोद लांडगे