Biodata Maker marathi
✕

पु ल देशपांडे लिखित एक सर्वोत्कृष्ट प्रार्थना अणि शुभेच्छा !

Published: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (17:22 IST)
 पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ 
मुद्यावर येण्याची माझ्यात 
सवय कर.
 
इतरांची दुःख व वेदना 
शांतपणे ऐकण्यास मला
 मदत करच पण त्यावेळी 
माझ तोंड शिवल्यासारखे 
बंद राहु दे. अशा प्रसंगी 
माझ्याच निराशा, वैफल्यांचे 
रडगाणे ऐकवण्याची माझी 
सवय कमी कर.
 
केंव्हा तरी माझीही चूक 
होउ शकते, कधीतरी माझाही 
घोटाळा होऊ शकतो,
 गैरसमजुत होऊ शकते 
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.
 
परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात 
प्रेमाचा ओलावा, गोडवा, 
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही 
हे मला माहीत आहेच, 
पण एक बिलंदर बेरकी 
खडूस माणूस म्हणून मी 
मरू नये अशी माझी
 प्रामाणिक इच्छा आहे.
 
विचारवंत होण्यास माझी 
ना नाही पण मला लहरी 
करू नकोस. दुसर्‍याला 
मदत करण्याची इच्छा 
आणि बुद्धी जरूर मला 
दे पण गरजवंतांवर 
हुकूमत गाजवण्याची
 इच्छा मला देऊ नकोस.
 
शहाणपणाचा महान ठेवा 
फक्त माझ्याकडेच आहे 
अशी माझी पक्की खात्री 
असूनसुद्धा, परमेश्वरा, 
ज्यांच्याकडे खरा सल्ला
 मागता येइल असे 
मोजके का होईना
 पण चार मित्र दे.
 
एवढीच माझी प्रार्थना...
 
    - पु.ल.देशपांडे
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

डिग्रीपेक्षा स्किल्सना जास्त महत्त्व! नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी कोणती कौशल्ये शिकावीत?

नेल एक्सटेन्शन्सचा नखांवर होतोय परिणाम? नखे मजबूत करण्यासाठी जाणून घ्या ५ उपाय!

नैसर्गिकरित्या लांब आणि दाट केसांसाठी करा ही महत्वाची ५ योगासने

प्रेरणादायी कथा : शांती, श्रद्धा, प्रेम आणि आशा; गोष्ट चार मेणबत्त्यांची

या ७ गोष्टी नवऱ्याला मुळीच सांगू नका! वैवाहिक नात्यात जपा या गोष्टींची मर्यादा

पुढील लेख
Show comments