सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (07:56 IST)

ऑन लाईन फूड ऑर्डर करताना आणि डिलेव्हरी घेताना ही खबरदारी घ्या, नाही तर संसर्गाचा धोका

अनलॉकमध्ये अनेक जागी बाहेरून म्हणजे ऑन लाईन जेवण मागविण्याची सूट देण्यात आली आहे. पण कोणत्याही प्रकाराच्या खाण्यापिण्याचा वस्तूंना ऑन लाईन मागवून आणि ते डिलिव्हर होईपर्यंत काही गोष्टी लक्षात ठेवण्या सारख्या आहेत. कारण बऱ्याच शहरांच्या व्यतिरिक्त परदेशातून देखील अशी प्रकरणे आली आहेत ज्यामध्ये वस्तूंना वाटप करणाराच डिलिव्हरी बॉय स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह निघाला. अश्या परिस्थितीत कोणत्याही प्रकाराच्या संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी घरी फूड पार्सल घेताना काही सावधगिरी बाळगायला हवी. 
 
ऑन लाईन फूड आल्यावर डिलिव्हरी बॉयशी सामाजिक अंतर राखा. त्या पार्सलला त्वरित सेनेटाईझ करावं. खाद्यपदार्थ पाकिटातून काढल्यावर त्वरितच ते उच्च तापमानात शिजवा. जेणे करून त्यात असलेले सर्व जंत मरतील. या अश्या लहान लहान गोष्टींची काळजी घेतल्यास आपण संसर्गापासून वाचू शकतो. 
 
ज्या रेस्टारेंट मधून आपण जेवण मागवत आहात तेथील स्वयंपाकघर चांगल्या प्रकारे सेनेटाईझ केले जात आहे की नाही या बद्दलची सर्व माहिती आपण ठेवा. त्याच बरोबर 
त्या रेस्टारेंट मधील कुक आणि वेटर्सचे तापमान देखील घेतले जात आहे की नाही हे जाणून घेणे देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत.
 
आपण ज्या रेस्टारेंट मधून जेवण मागवत आहात तेथे शासनाने दिलेले सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्या जात आहे किंवा नाही, ह्याची चौकशी करून घेतल्यानंतरच जेवण मागवणे आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरेल. 
 
याव्यतिरिक्त डिलिव्हरी बॉयशी सामाजिक अंतर राखून, स्वत: मास्क लावून आणि पार्सल सेनेटाईझ करून उघडल्यावरच त्याचा कागदाला कचराकुंडीमध्ये टाका. जेणे करून त्याचा कोणाशीही थेट सम्पर्क होऊ नये. आपल्या डिलिव्हरी बॉयला या बाबतीत आधीच कळवावे.
 
आपल्या पार्सलची डिलिव्हरी घराच्या बाहेरच घ्यावी. जरी आपण घरात असला तरी डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात येण्याच्या आधी मास्क आणि हातामध्ये ग्लव्हज घालूनच पार्सलला हात लावा. मागवलेले पदार्थ पॉलिथिनच्या साहाय्याने धरा. लक्षात ठेवा की त्या डिलिव्हरी देणाऱ्या मुलाने मास्क किंवा ग्लव्ज घातले आहे किंवा नाही. जर का तो या सर्व नियमांचे पालन करत नसेल तर पार्सल घेण्यास नकार द्या.
 
संसर्गापासून वाचण्यासाठी कॅश देणं टाळावं. पेमेंट करण्यासाठी ऑन लाईन मोड वापरावं. हल्ली बरेचशे अॅप उपलब्ध आहेत म्हणून रोख रक्कम किंवा स्वाईप मशीनने पैसे देणं टाळावं. 
 
अश्या लहान लहान गोष्टींकडे लक्ष देऊन काळजी घेऊन आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कोरोना संसर्गापासून वाचवू शकता.