Daily Horoscope
✕

मासिक पाळी आल्यानंतर कोणता योग्य आहार घ्यावा आणि कोणता टाळावा?

Updated: शनिवार, 30 मे 2026 (21:42 IST)
 
हिरव्या पालेभाज्या आणि फळे: फायबर आणि जीवनसत्त्वांनी भरपूर असलेल्या भाज्या खाव्यात. फळांमध्ये केळी (यातील पोटॅशियम कँप्स कमी करते), टरबूज आणि संत्री खाणे फायदेशीर ठरते.
 
ड्राय फ्रूट्स आणि बिया : बदाम, अक्रोड आणि जवस  किंवा भोपळ्याच्या बिया खाव्यात. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे स्नायूंचे दुखणे कमी करते.
 
हळदीचे दूध किंवा अद्रक चहा: रात्री झोपताना हळद घातलेले कोमट दूध प्यायल्याने अंगदुखी कमी होते आणि झोप छान लागते. आल्याचा चहा देखील पोटदुखीवर आराम देतो.
 
काय खाणे टाळावे? (अयोग्य आहार)
अति तिखट आणि मसालेदार अन्न: जास्त तिखट किंवा मसाल्यांचे पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते आणि गॅसचा त्रास वाढून उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.
 
जास्त मीठ असलेले पदार्थ: चिप्स, कुरकुरे, पापड, लोणचे किंवा पॅकबंद फूड खाणे टाळा. मिठामध्ये सोडियम असते, ज्यामुळे शरीरात पाणी साठून राहते आणि पोट जास्त फुगल्यासारखे वाटते.
 
कॅफिन (चहा/कॉफीचे अतिप्रमाण): पाळीच्या दिवसांत खूप जास्त चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. कॅफिनमुळे डिहायड्रेशन होते आणि पोटदुखी वाढू शकते. दिवसातून १-२ कप ठीक आहे, पण अतिरेक टाळावा.
 
गोड आणि बेकरीचे पदार्थ : चॉकलेट, केक, बिस्किटे किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि लगेच कमी होते. यामुळे मूड स्विग्ज (चिडचिड होणे) जास्त वाढतात.
 
थंड पेये आणि आईस्क्रीम: पाळीच्या दिवसांत अतिशय थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम खाणे टाळावे. यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन वाढून वेदना तीव्र होऊ शकतात.
 
विशेष टीप (डार्क चॉकलेट): जर तुम्हाला या दिवसांत गोड खाण्याची तीव्र इच्छा  झाली, तर सामान्य चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट (Dark Chocolate) खा. यात मॅग्नेशियम आणि लोह असते, जे वेदना कमी करण्यास आणि मूड चांगला ठेवण्यास मदत करते. तसेच या दिवसांत हलका व्यायाम किंवा कोमट पाण्याने पोटाला शेक देणे देखील खूप आरामदायी ठरते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मासिक पाळीच्या काळात पॅड वापरताना अशी काळजी घ्या
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मासिक पाळीत तीव्र वेदना झाल्यास काय करावे, वेदना थांबवण्याचे उपाय जाणून घ्या
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

कमी तेलात खुसखुशीत चिवडा कसा बनवाल? कुरकुरीतपणा टिकवण्याची युक्ती

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

महाराष्ट्रातील दहा प्रसिद्ध व्यंजन म्हणजे चविष्ट, पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण पदार्थांची मेजवानी

नखे आणि हिरड्यांमधील बदलांकडे दुर्लक्ष करू नका! आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे संकेत ओळखा

LLM Labour Law करून बनवा कामगार कायद्यात करिअर! पात्रता, टॉप कॉलेजेस, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments