बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified मंगळवार, 28 मे 2019 (15:01 IST)

एगलेस मँगो केक

साहित्य : दीड कप कणीक, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 100 ग्रॅम बटर, 200 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 1 कप मँगो प्युरी, 3-4 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून व्हेनिला इसेंस. 
 
कृती : सर्वप्रथम ओव्हनला 180 डिग्री सें. वर 15 मिनिटापर्यंत प्रीहीट करा. कणकेला बारीक चाळणीने चाळून घ्या. यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिसळून वेगळे ठेवा. एका बाऊलमध्ये बटर, मँगो प्युरी, कंडेंस्ड मिल्क, साखर आणि व्हेनिला इसेंस फ्लफी होईपर्यंत फेटून घ्या. आता यात कणीक मिसळून एकाच दिशेने परत फेटा. या मिश्रणाला केक टिनमध्ये घाला. प्रीहीट ओव्हनमध्ये केक टीनं ठेवून 40 मिनिटापर्यंत बेक करा.