मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified शनिवार, 2 मे 2020 (13:19 IST)

घरच्या घरी तयार करा रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी

साहित्य - कलिंगडाची साल, साखर, पाणी, खाण्याचा रंग- हिरवा, पिवळा, लाल किंवा आवडीप्रमाणे.

कृती : कलिंगडाची हिरवी साल पूर्ण काढून फक्त सालीचा पांढरा भाग घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. एका पातेल्यात ते तुकडे बुडतील एवढं पाणी घालून उकळावे. जरा शिजत आल्यावर गॅस बंद करून चाळणी मध्ये हे तुकडे ठेवावे ज्याने जास्तीचं पाणी ‍निघून जाईल. 
आता एका पात्रात साधारण 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी एकत्र करून उकळून घ्यावे. साखर पूर्ण विरघळल्यावर कलिंगडाच्या सालीचे तुकडे पाकात घालून 10 मिनिटं उकळून घ्यावे. आता या टुटी फ्रुटी 3 ते 4 वाट्यामध्ये काढून हवे ते रंग घालून 2 ते 3 तास तसेच ठेवावे. जेणे करून पाक आणि रंग टुटी फ्रुटी मध्ये चांगले मुरेल. 
एका ट्रे ला फॉइल पेपर लावून त्यावर तयार केलेली टुटी फ्रुटी पसरून घ्यावी आणि दिवसभर उन्हात वाळत ठेवायची. घरच्या घरी टुटी फ्रुटी तयार.