शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (13:43 IST)

चैत्र गौरी नैवेद्य : चविष्ट करंजी

karanji
साहित्य - 1 वाटी रवा, 1/2 वाटी मैदा, मीठ (चवीपुरती), तेलाचे मोहन, 2 वाटी पीठी साखर, 2 चमचे खसखस. सारणासाठी साहित्य -  1/2 वाटी किसलेले खोबरे, मावा, 2 चमचे रवा, दूध, वेलची पूड, चारोळ्या, बेदाणे, तळण्यासाठी साजूक तूप.
 
कृती- रवा मैदा एकत्र करून त्यात मीठ घालावे. तेलाचे मोहन टाकावे आणि मोहन एवढे टाकणे की त्या रवा मैद्याची मूठ वळता येईल. त्यात लागत लागत पाणी घालून मळून घ्यावे. त्या गोळ्याला कापड्याने झाकून 1 तास ठेवावे.
 
सारणाची कृती - मावा तांबूस रंग येईपर्यंत खरपूस भाजावा. त्या माव्याला थंड होण्यासाठी ठेवावे. किसलेले खोबरे पण परतून घ्यावे. रवा एका वाटीत थोडंसं दूध घालून नरम होण्यासाठी ठेवावा. खसखस भाजून त्याची भुकटी बनवावी. चारोळ्यादेखील परतून घ्यावा. थंड झालेल्या माव्यात किसलेले खोबरे, खसखस, वेलची पूड, भिजवलेला नरम रवा, पीठीसाखर, बेदाणे घालून सारण तयार करावं.
 
आता भिजवलेल्या गोळ्याचा लहान लहान गोळे करून त्याला लाटून घ्यावे त्या पारीच्या कडेला दुधाचा हात लावावा. त्यामध्ये सारण भरावे. करंजीचा आकार देऊन त्याला झाकून ठेवावे. सगळ्या करंज्या करून झाल्या की त्याला कढईत साजूक तुपात मध्यम आचेवर हलक्या गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. 
 
खमंग खुसखुशीत करंजी तयार...