शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

मुलांच्या प्रगतीसाठी अमलात आणा या वास्तू टिप्स

मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची खोली वस्तूप्रमाणे असायला हवी. वस्तूप्रमाणे बदल केल्याने मुलांची मानसिक वाढ होत असून त्यांची ग्रहण करण्याची क्षमतादेखील वाढते. याने मुलं मन लावून अभ्यास करतात व त्यांचं आरोग्यही उत्तम राहतं.


 

 
* घरात मुलांची खोली पूर्व, उत्तर, पश्चिम किंवा वायव्य दिशेत असणे चांगले असते. दक्षिण, नैऋत्य किंवा आग्नेय मध्ये मुलांची खोली नसावी.
 
* मुलांच्या खोलीतील रंग पूर्णपणे त्यांच्या शुभ रंगाप्रमाणे असायला हवा. मुलांच्या पत्रिकेप्रमाणे हे निश्चित करायला हवं.

 
* परद्याचा रंग भिंतीच्या रंगापेक्षा गडद असायला हवा.
 
मुलांचा पलंग उंच नसला पाहिजे. आणि झोपताना त्यांचे डोके पूर्व दिशेकडे आणि पाय ‍पश्चिमीकडे असावेत.
 
पलंगाच्या उत्तर दिशेकडे टेबल-खुर्ची असावी.
 
अभ्यास करताना मुलांचे तोंड पूर्वीकडे आणि पाठ पश्चिमीकडे असली पाहिजे.

 
* पलंगाच्या दक्षिण दिशेकडे आग्नेय कोणात कम्प्यूटर ठेवले पाहिजे.
 
खोलीचे दार पूर्वीकडे असल्यास पलंग उत्तर-दक्षिण या दिशेत ठेवायला पाहिजे. आणि डोकं दक्षिणेकडे तर पाय उत्तरकडे असले पाहिजे. अशात कम्प्यूटर टेबलाजवळच स्टडी टेबल असावं.
 
नैऋत्य कोणात मुलांच्या पुस्तकांची व कपड्यांची अलमारी ठेवली पाहिजे.
 
मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश पर्याप्त येत असल्याची काळची घ्यावी.

 

* मुलांच्या खोलीत हिंसक किंवा बटबटीत चित्र लावू नये.
 
मुलांच्या खोलीत नैसर्गिक सौंदर्य, पाळतू जनावर किंवा महापुरुषांचे चित्र लावले पाहिजे.

मुलं लहान असल्यास कार्टून आणि मोठा असल्यास त्याला ज्यात करिअर करायचे आहेत त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींचे चित्र लावणे उत्तम.
 
मुलांच्या खोलीतली कोणतीही खिडकी घराच्या इतर खोलीच्या बाजूला उघडणारी नको. याने ते घरातल्या हालचालीने डिस्टर्ब होतात.