गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहे हे संकेत, जर दिसले तर सावध राहा...

शुभ आणि अशुभ
शास्त्रानुसार शुभ आणि अशुभ सारख्या संकेतांना आम्ही बर्‍याच वेळा वाचत आलो आहे, तसेच भारताची प्राचीनतम विद्यांपैकी एक वास्तुशास्त्रात देखील असे काही संकेत असतात ज्यांना आम्ही अशुभ मानतो. ह्या संकेतांप्रमाणे ज्या कामाला तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात ते कदाचित अपयशी ठरू शकत, त्याशिवाय ते येणार्‍या वाईट दिवसांकडे इशारा देखील करतात.  
 
जमिनीची खुदाई
जर तुम्ही एखाद्या जागेची खुदाई करत असाल आणि तेथे मृत जीव, खास करून सर्प निघाला तर याचा अर्थ असा आहे की तुमचा वाईट काळ येणार आहे.  
 
राख किंवा हाड 
तसेच जर जमिनीची खुदाई करताना राख किंवा हंड्यांसारख्या वस्तू मिळाल्या तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर एखादा धोका येणार आहे. तुम्हाला लवकरच शांती पूजा करवायला पाहिजे.  
 
उबड खाबड जमीन  
जर तुमचे घर फारच उबड खाबड जागेवर किंवा वाकड्या तिकड्या जमिनीवर असेल तर याचा अर्थ असा आहे की घरात राहणार्‍या लोकांना प्रत्येक वेळेस अडचणींचा सामना करावा लागणार आहे.  
 
काळ्या उंदरांचे येणे  
जर घरात अचानक काळे उंदरांचे येणे जाणे वाढत असेल आणि त्यांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागली तर समजा तुमच्या दारी संकट येणार आहे.  
 
लाल मुंगळ्या
वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की ज्या घरात बर्‍याच प्रमाणात काळ्या मुंगळ्या येतात तेव्हा धनवर्षा होते. पण जर ह्या मुंगळ्या काळ्या नसून लाल असतील तर मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे.  
 
दीमक किंवा मधमाशी
जर तुमच्या घरात दीमक आली असेल किंवा मधमाशी ने आपला पोळा बनवला असेल तर गृहस्वामीला असहनीय पीडेचा त्रास भोगावा लागतो.  
 
उत्तर दिशा
घरातील उत्तर दिशा जर मोकळी असेल तर हे देखील समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे, म्हणून काळजीपूर्वक आपल्या घरातील ही दिशा बंद ठेवायला पाहिजे.  
 
मुख्य द्वार
तुमच्या घरातील मुख्य द्वार फार जास्त मोठे किंवा उघडे नसावे. जर असे असेल तर घरातील मंडळींना बर्‍याच दुःखातून जावे लागणार आहे असे वास्तुशास्त्रात दिले आहे.  
 
घराच्या समोर रस्ता  
जर घराच्या समोर एखादा रस्ता जात असेल तर त्या घराच्या लोकांसाठी हे योग्य नसते. या गोष्टींचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे की तुमचे घर रस्त्यावर स्थित नसावे.  
 
विशाल वृक्ष
जर घरासमोर मोठे झाड असेल तर घरातील लोक एकमेकांवर ईर्ष्या ठेवतात, ते आपल्या कुटुंबासाठी देखील ईर्ष्यालु होऊन जातात. तसेच बाहेर एखादी विहीर असेल तर कुटुंबातील लोकांना मानसिक विकार होण्याची शक्यता असते.  
 
मुखिया
घरातील मधोमध कुठलीही वजनी किंवा भारी वस्तू नाही ठेवायला पाहिजे, नाहीतर घरातील प्रमुख व्यक्तीला त्रास होण्याची शक्यता असते.