रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

असं असावं वर्किंग वूमनचं डाइट प्लान

घर आणि जॉब यात व्यस्त महिला स्वत:ची तारांबळ करून घेतात. स्वत:च्या आहाराकडे दुर्लक्ष करतात ज्याने पोषक तत्त्वांची कमी होऊन रोग प्रतिकारक क्षमता कमी होते आणि अनेक प्रकाराच्या आजारांना समोरा जावं लागतं. अनेक स्त्रिया वजन वाढू नये म्हणून कमी आहार घेतात परंतू याने पचन संबंधी समस्या उद्भवतात ज्यात गॅसची समस्या, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सामील आहे.
 
असा असावा डाइट प्लान
 
ब्रेकफास्ट
सकाळचा नाश्ता कधीही टाळू नये कारण दिवसभर काम करण्यासाठी लागणार्‍या ऊर्जेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेकफास्टमध्ये आपण दूध, सांजा, कॉर्नफ्लॅक्स, सँडविच इत्यादी घेऊ शकता. किंवा फ्रूट चाट ही चांगला पर्याय आहे. यात सफरचंद, पपई, डाळिंब सामील करता येऊ शकतं. ड्राय फ्रूट्ससोबत एक ग्लास दूधही योग्य ठरेल.
 
लंच
दुपारच्या जेवणात वरण, भाजी, चपाती आणि कोशिंबीर सामील करावे. गरमीच्या दिवसात दही किंवा ताक घ्यावे. हिरव्या भाज्या, पनीर, कोशिंबीर सामील करावे. संध्याकाळी लाइट स्नेक्स लंच मध्ये फळं किंवा स्प्राउट्स घेता येतील.
 
डिनर
झोपण्याच्या दोन तासापूर्वी डिनर घेणे योग्य ठरतं. यात मसालेदार पदार्थ टाळावे. लाइट पदार्थ खावे. झोपण्यापूर्वी दूध घेण्याची सवय असल्यास कमी फॅट्स असलेले दूध घ्यावे. रात्री दूध उकळून त्यात आलं किंवा वेलची घालावी. जेवल्यानंतर किमान 20 मिनिट वॉक करावे.