गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तू शास्त्रानुसार गरिबी आणि दुर्भाग्य वाढवतात ह्या 8 सवयी

वास्तुशास्त्रात 8 अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहे, ज्यांचे लक्ष ठेवले तर तुमच्या नोकरीत आणि व्यवसायात प्रगती होऊन तुम्हाला धन लाभ मिळत राहील. त्याशिवाय घरात राहणार्‍या लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते. जर वास्तूच्या या 8 टिप्सकडे लक्ष्य दिले तर तुम्हाला प्रत्येक दिशेत फायदा मिळेल. जाणून घ्या कोण कोणत्या आहे त्या 8 खास टिप्स.  
 
ज्या अल्मारीत पैसा किंवा किंमती सामान ठेवता, त्याच्या मागे किंवा त्याला लागून झाडू नाही ठेवायला पाहिजे. असे केल्याने धनहानी होते.  
 
किचनमध्ये औषध ठेवणे वास्तूप्रमाणे चुकीचे आहे. असे केल्याने घरातील लोकांच्या आरोग्यात सदैव चढ उतार राहत असतो.  
 
बाथरूम आणि टॉयलेटचे विनाकारण उघडे ठेवल्याने घर-दुकानात सतत धनहानी होत असते.  
 
घराच्या भिंतीवर आणि फरशीवर मुलांना पेन्सिल, चॉक किंवा कोळशाने रेघोट्या काढू देऊ नये. असे मानले जाते की यामुळे खर्च आणि उधारी वाढते.  
 
घराच्या दक्षिण दिशेत एक्वेरियम किंवा पाण्याशी निगडित एखादी मूर्ती किंवा शो पीस नाही लावायला पाहिजे. यामुळे इन्कम कमी होते आणि खर्चात वाढ होते.  
 
घर- दुकानाच्या उत्तर-पूर्व दिशेला कधीही अस्वच्छ नाही ठेवायला पाहिजे. असे केल्याने विष्णू आणि लक्ष्मी नाराज होतात.  
 
देवघर कधीपण बेडरूममध्ये नसावे. असे केल्याने घरात वाद विवाद, आर्थिक अडचण आणि दुसर्‍या बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
घरात काटेरी रोप, दूध निघणारे आणि विषारी झाड झुडपं नाही लावायला पाहिजे. यामुळे धन आणि आरोग्याची हानी होते.