बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (00:07 IST)

बर्थ डेट अनुसार वास्तू उपाय

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी असतो. जर बर्थ डेट (मूलांक)ला लक्षात ठेवून त्याच्याशी संबंधित दिशेत वास्तूची एक एक वस्तू ठेवण्यात आली तर त्याचे बरेच फायदे मिळू शकतात. यामुळे फक्त तुमचे भाग्यच चमकत नाही बलकी धन लाभपण होऊ शकतो.  
 
कसे काढावे मूलांक – या साठी तुम्हाला तुमची जन्म तारखेला सिंगल डिजीटमध्ये काढावे लागेल, अर्थात जर तुमची जन्म तारीख 12 असेल तर तुमचा मूलांक असेल 1+2= 3, जर तुमची जन्म तारीख 29 असेल तर तुमचे मूलांक होगा 2+9=11, रिझल्ट दोन अंकांमध्ये आला तर या दोन अंकांना परत परस्पर जोडले जातात जसे 1+1=2
 
मूलांक 1 – 
मूलांक 1 असणार्‍या लोकांची शुभ दिशा पूर्व आणि संबंधित ग्रह सूर्य आहे. या अंकाच्या व्यक्तीला पूर्व दिशेत बासरी ठेवायला पाहिजे.  
 
मूलांक 2 – 
उत्तर-पश्चिम दिशेशी संबंधित ग्रह चंद्र आहे. मूलांक 2 असणार्‍या लोकांना या दिशेत पांढर्‍या रंगाचे एखादे शोपीस ठेवायला पाहिजे.  
 
मूलांक 3 –
बृहस्पतीशी संबंधित दिशा उत्तर-पूर्व आहे. 3 मूलांक असणार्‍या लोकांना उत्तर-पूर्व दिशेत रुद्राक्ष ठेवायला पाहिजे.  
 
मूलांक 4 –
दक्षिण-पश्चिम दिशेचा स्वामी राहू आहे. 4 मूलांकच्या लोकांना या दिशेत काचेची एखादी वस्तू ठेवायला पाहिजे.  
 
मूलांक 5 –
उत्तर दिशेचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्यांचा मूलांक 5 असेल त्यांनी घराच्या उत्तर दिशेत लक्ष्मी किंवा कुबेराची मूर्ती ठेवायला पाहिजे.  
 
मूलांक 6 – 
शुक्राचा संबंध दक्षिण-पूर्व दिशेशी असतो. ज्या लोकांचा मूलांक 6 आहे त्यांना या दिशेत मोरपंख ठेवायला पाहिजे.  
 
मूलांक 7 –
ज्यांचे मूलांक 7 आहे, त्यांनी उत्तर-पूर्व दिशेत रुद्राक्ष ठेवायला पाहिजे. या दिशेचा स्वामी गुरु आहे.  
 
मूलांक 8 –
ज्या लोकांचे मूलांक 8 आहे, त्यांनी आपल्या घराच्या पश्चिम दिशेत काळ्या रंगाचा क्रिस्टल ठेवायला पाहिजे. ही दिशा शनी ग्रहाशी संबंधित आहे.  
 
मूलांक 9 –
ज्या लोकांचे मूलांक 9 आहे त्यांनी घराच्या दक्षिण दिशेत पिरामिड ठेवायला पाहिजे. ही दिशा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे.