बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

वास्तुटिप्स: घराच्या या भागात चुकूनही ताळे लावू नये, दुर्भाग्य वाढेल

घराच्या सुरक्षेसाठी ताळा आणि किल्ली दोन्ही महत्त्वाचे असतात. ताळ्याबगैर कुठलेही घर किंवा दुकान अपूर्ण असतात. आम्ही कुठेही राहिलो तरी आपल्या मूल्यवान संपत्तीची सुरक्षा, महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि पूर्ण घराच्या सुरक्षेसाठी ताळच्या वापर करतो. घरात लागलेले ताळे आमच्या मनात सुरक्षेची भावना उत्पन्न करतात. वास्तुशास्त्रात ताळ्यांबद्दल बरेच नियम सांगण्यात आले आहे. वास्तुविद म्हणतात की या नियमांचे पालन केल्याने घराची सुरक्षा वाढते आणि कुठल्याही प्रकाराची चोरी किंवा नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते.
 
आम्हाला नेहमी दिशा लक्षात ठेवून ताळे लावायला पाहिजे. पूर्वीकडे सूर्याचा स्थान असतो म्हणून या दिशेत नेहमी तांब्याचा ताळा लावायला पाहिजे. यामुळे घराची सुरक्षा वाढते आणि चोरीची भिती कमी राहते. जेव्हा की पश्चिम दिशेत नेहमी लोखंडाचे मजबूत ताळे लावायला पाहिजे.  तसेच पश्चिम दिशेत लावण्यात आलेल्या ताळ्याचा रंग काळा असायला पाहिजे, तर चोरीचा धोका फारच कमी राहतो. या दिशेत चुकूनही तांब्याचा ताळा नाही लावायला पाहिजे.
 
वास्तूनुसार, उत्तरेत पितळेचा ताळा लावल्याने सुरक्षा वाढते. जर या दिशेत धातूचा ताळा लावत असाल तर लक्षात ठेवाकी त्याचा रंग सोनेरी असायला पाहिजे. या दिशेत मोठे कारखाने किंवा शोरूममध्ये लागणार्‍या ताळ्यांची संख्या जर पाच असेल तर चोरी आणि नुकसान होण्याची शक्यता कमी असते. दक्षिण दिशेत पाच धातूंचा ताळा लावला किंवा जड ताळा लावला तर सुरक्षा वाढते. जर पाच धातूंचे ताळे लावणे शक्य नसेल तर ताळ्यावर लाल किंवा चेरी रंग चढवू शकता.  
 
जर घर, दुकान किंवा फ्लॅट उत्तर-पूर्व मुखी असेल तर पिवळ्या रंगाचा ताळा लावायला पाहिजे. पश्चिम-पूर्वेकडे देखील लाल किंवा चेरी रंगाचा ताळा लावायला पाहिजे. दक्षिण-पश्चिम दिशेत राहूची जागा असते आणि चोरीचा धोका कमी राहतो. येथे नेहमी जाड आणि भुरकट रंगाचा ताळा लावायला पाहिजे.  
 
उत्तर-पश्चिम दिशेत लागणारे ताळे चांदीच्या रंगाचे असल्याने सुरक्षा वाढते. त्याशिवाय छतावर लागणारे ताळे निळे किंवा आसमानी रंगाचे असेल तर उत्तम. याची संख्या दोनपेक्षा जास्त असली पाहिजे. बेसमेंटमध्ये चमकदार रंगांचे ताळे लावायला पाहिजे आणि याची संख्या एकापेक्षा जास्त असायला पाहिजे. घरातील देवघरात कधीही ताळे नाही लावायला पाहिजे.