1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Sant Gadge Baba's Punyathithi 2025 Messages in Marahti

Sant Gadge Baba's Punyathithi 2025 Messages in Marahti संत गाडगे बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा मंत्र देणारे आणि 
दीन-दलितांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणारे 
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
ज्यांच्या विचारात संपूर्ण समाजाला सुधारण्याची ताकद होती, 
अशा संत गाडगे बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
 
अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि स्वच्छतेबाबत समाजप्रबोधन करणारे 
थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांना पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!
 
"देव देवळात नसून तो माणसात आहे," 
हे कृतीतून सिद्ध करणाऱ्या संत गाडगे बाबांना 
पुण्यतिथी दिनी कोटी कोटी वंदन!
 
कीर्तनाच्या माध्यमातून समाजमन स्वच्छ करणाऱ्या आणि 
स्वच्छतेचा प्रत्यक्ष धडा देणाऱ्या महापुरुषाला विनम्र अभिवादन!
 
कर्मयोगाचा खरा अर्थ जगाला समजावून सांगणारे, 
गोरगरिबांचे कैवारी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त 
त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

महान समाजसुधारक ज्यांनी स्वतः राबून धर्मशाळा, शाळा आणि रुग्णालये बांधली, 
अशा कर्मयोगी गाडगे बाबांना मानाचा मुजरा!
 
अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची आणि स्वच्छतेची ज्योत पेटवणाऱ्या 
गाडगे बाबांच्या विचारांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
 
स्वच्छता, शिक्षण आणि माणुसकी हीच खरी ईश्वरसेवा मानणाऱ्या 
संत गाडगे बाबांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
पुढील लेख
२२ डिसेंबर रोजी श्री नृसिंह सरस्वती जयंती, दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार, संपूर्ण माहिती जाणून घ्या