शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (14:48 IST)

घराला रंग देत आहात, तर या काही वास्तू टिप्स आपल्या कामी येतील

सध्या सणांची रेल पैल सुरु आहे. आता जवळच दिवाळी येऊन टिपली आहे. त्यामुळे सध्या घरा-घरात स्वच्छता करणं सुरूच आहे. लोक आपल्या घरांना रंग करवीत आहे. पण सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व सण आपापल्या घरातच साजरे होत आहे. कारण सामाजिक अंतर राखण महत्वाचे आहे. पण त्यासाठी महत्वाचे आहे स्वच्छता राखणं. आणि लोक आपल्या घराची स्वच्छता करत आहे. या स्वच्छते मध्ये आपण आपल्या नव्या घराला किंवा जुन्या घराला नवा रंग देऊन घराच्या सौंदर्यामध्ये वाढ करावयाचे इच्छित आहात ? जर हो, तर आपल्या घराला रंग करण्यापूर्वी हे जाणून घेऊया की कोणता रंग दिल्यावर आपल्या घराचे सौंदर्य उजळून दिसेल.
 
1 पिवळा रंग - पिवळा रंग डोळ्यांना आराम देणारा आणि चांगला प्रकाश देणारा आहे. घराच्या बैठकीत, ऑफिसच्या भिंतींवर आपण पिवळा रंग दिल्याने वास्तुनुसार शुभ ठरेल.
 
2 आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्या खोलीच्या उत्तरेकडील भिंतींवर हिरवा रंग लावावा.
 
3 आकाशी रंग पाण्याचे घटक दर्शवतात. घराच्या उत्तरेकडील भिंतींना हा रंग द्यावा.
 
4 घराच्या खिडक्या आणि दार नेहमी गडद रंगानी रंगवा. गडद तपकिरी रंग देणे जास्त योग्य आहे.

5 शक्य असल्यास घराला रंगविण्यासाठी नेहमी फिकट आणि हलके रंग वापरा.