मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तु टिप्स: स्वयंपाकघरात हे फोटो लावल्याने कोठार धान्याने भरेल

घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. सणवार असो वा वाढदिवस जोपर्यंत स्वयंपाकघरातून घमघमीत सुंगध पसरत नाही तोपर्यंत कशालाच मजा नाही. हिंदू धर्माप्रमाणे स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्ण वास करते. देवीच्या कृपने धान्याचे कोठार भरलेले राहतात. म्हणून स्वयंपाकघरात देवीचा चित्र अवश्य लावावा पाहिजे. घरात तयार होत असलेल्या प्रत्येक पदार्थांचा नैवेद्य दाखवून पूर्ण कुटुंबाने आनंदाने सेवन करावे. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतील.
 
घरात नेहमी अन्न धनाचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धणे अर्पित करून स्वयंपाकघरात लपवून ठेवावे.
देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावा. याने घराची सुरक्षा वाढते.
मान-सन्मान आणि यश मिळवण्यासाठी देवी अन्नपूर्णेला मुगाची डाळ अर्पित करून ती डाळ गायीला खाऊ घालावी.
तसेच घरात फळं आणि भाज्यांचे चित्र लावल्याने भरभराटी राहते.
स्वयंपाक घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी उत्तर पूर्व दिशेत शेंदुरी गणपतीचा फोटो लावावा.
धान्य, मूग, गहू, जवस, काळे तीळ, ज्वार, मोहर्‍या हे सर्व एक कपड्यात बांधून पोटल्या तयार कराव्या. आणि घरातील प्रत्येक खोलीत ठेवाव्या. अशाने घरात धान्याची भरभराटी राहते. 
तसेच घरातील चुल्हा पूर्व दिशेला असणे शुभ आहे. 
आणि घरातील महिलांना अन्नपूर्णेला उपाधी देण्यात आली आहे म्हणून महिलांना लक्षात ठेवण्यासारखे गोष्टींकडे एकदा लक्ष देणे योग्य ठरेल.
दररोज अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे.
स्वयंपाकघरात अगदी शांत आणि प्रेमळ मनाने भोजन तयार करावे. 
भेद भाव न करता घरातील प्रत्येक सदस्याला जेवण वाढावे.
घरात येणार्‍या पाहुण्यांना रिकाम्या पोटी पाठवू नये.